परदेशी चलनाचा पर्दाफाश

 Santacruz
परदेशी चलनाचा पर्दाफाश

सांताक्रुझ - आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागानं परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केलीय. अब्दुल रशीद कासारगौडला असं याचं नाव आहे. त्याच्याकडून २९ लाख, ७३ हजार ८४२ परदेशी चलन जप्त करण्यात आलंय.  अबुधाबीवरून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून परदेशी चलनाची तस्करी होणार असल्याची माहिती सीमा शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. अब्दुल रशीदवर पोलिसांना संशय आला. त्याच्या सामानाची तपासणी केली असता बॅगेत परदेशी चलन सापडले.

Loading Comments