चारधाम यात्राही शिक्षेपासून वाचवू शकली नाही


चारधाम यात्राही शिक्षेपासून वाचवू शकली नाही
SHARES

दीड कोटी रूपयांच्या परदेशी चलन चोरीचा गुन्हा विलेपार्ले पोलिसांनी सोड़वला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपलं पाप धुण्यासाठी आरोपी चारधाम यात्रेला गेल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका स्कॉर्पियो गाडीसह जवळपास एक कोटी रुपये किमतीचं परदेशी चलन पोलिसांनी जप्त केलं आहे.

विलेपार्ले येथील मांगलिक फोरेक्स आणि एमआईडीसी येथील व्हिकेसी फॉरेक्स या कंपनीमधून 18 मार्चला तब्बल दीड कोटींचे परदेशी चलन चोरीला गेल्याचं समोर आलं होतं. ज्यात पाऊंड, डॉलर, यूरोसह इंडोनेशियन चलनाच समावेश होता. ज्यावेळी कंपनीतील सीसीटीव्हीचे फूटेज तपासण्यात आले तेव्हा या चोरीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या भगवतसिंग वाघेला आणि जसवंत सिंग यांचा हात असल्याचं समोर आलं.

गुन्हा दाखल होताच विलेपार्ले पोलिसांची टीम आरोपींच्या मूळगावी राजस्थानला रवाना झाली. पण तिथेही ते सापडले नाहीत. तब्बल 17 दिवस पोलीस राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये तळ ठोकून होते. पण या चोरांचा कुठेच पत्ता लागत नव्हता. शेवटी गुरुवारी पैसे बदलण्यासाठी हे चोर मुंबई सेंट्रलला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि तिथे सापळा रचून या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती झोन 8 चे पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा