राज्यात एका दिवसात ६७ लाख रूपये किंमतीचं परदेशी मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे.

राज्यात एका दिवसात ६७ लाख रूपये किंमतीचं परदेशी मद्य जप्त
SHARES

गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या परदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असा एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर (sion-panvel) खारघर उड्डाण पुलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसंच अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची या महिन्यातील अशा प्रकारची तिसरी मोठी कारवाई आहे.

हेही वाचा- मुंबईत ५० टक्के लसीकरणानंतरच पूर्ण अनलाॅक- अस्लम शेख

सायन-पनवेल मार्गावर खारघर (kharghar) उड्डाण पुलाखालून अवैधरित्या परदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या परदेशी  मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवलं आहे.

गेल्या ६ दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल इथं गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोके, तर २० मे रोजी उस्मानाबाद इथंही ४३ लाख ९३ हजार रुपये किमतीचे अवैध मद्याच्या ५७५ खोक्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.

(foreign liquor worth rupees 67 lakh seized in maharashtra on 25th may 2021)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा