टाटा फायनान्सचे माजी MD दिलीप पेंडसेंची आत्महत्या

Dadar
टाटा फायनान्सचे माजी MD दिलीप पेंडसेंची आत्महत्या
टाटा फायनान्सचे माजी MD दिलीप पेंडसेंची आत्महत्या
See all
मुंबई  -  

टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेंडसे (61) यांनी आपल्या कार्यालयातच आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


आत्महत्येमागचे कारण?

दिलीप पेंडसे दादर पूर्वेकडील रॉयल ग्रेस या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहात होते. याच इमारतीत त्यांचे कार्यालय देखील आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दिलीप पेंडसे आपल्या कार्यालयात गेले होते. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास जेव्हा शेजारचे त्यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना दिलीप सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.


त्यांच्या कार्यालयातून सुसाईड नोटही मिळाली आहे. वैयक्तिक जीवनाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी 'कोणालाही दोषी ठरवू नये', असा उल्लेख या सुसाईट नोटमध्ये असल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस प्रवक्त्या (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.


झाली होती शिक्षा

2001 पेंडसे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोट्यात गेली होती. तेव्हा दिलीप पेंडसे यांच्या विरोधात तक्रार देखील करण्यात आली होती. या प्रकरणी पेंडसे यांना कारावास देखील भोगावा लागला होता.



हे देखील वाचा -

...म्हणून केली पत्नीची हत्या



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.