...म्हणून केली पत्नीची हत्या


...म्हणून केली पत्नीची हत्या
SHARES

20 लाख रुपयांच्या मालमत्ता कराच्या नादात एका 65 वर्षांच्या व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईच्या कलिना येथे घडली आहे. 65 वर्षांंच्या या व्यक्तीचे नाव रॉक डिसुझा असून त्याने रविवारी संध्याकाळी त्याच्या 57 वर्षांच्या पत्नी सेलिन डिसुझा (57) यांची हत्या केली. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी रॉकला अटक केली आहे.


का केली पत्नीची हत्या?

1982 साली रॉक आणि सेलिन यांचे लग्न झाले होते. या दोघांनाही मूलबाळ नव्हते. हे दोघे कलिना येथे गेल्या 35 वर्षांपासून राहात होते. खासगी कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर डिसुझा कुटुंबाचे एकमेव उत्पनाचे साधन म्हणजे त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेले इस्त्रीचे आणि किराणा मालाचे दुकान.

काही दिवसांपूर्वी पालिकेने डिसुझा कुटुंबाला मालमत्ता कराचे बिल पाठवले. या बिलाची रक्कम बघून दोघेही नवरा-बायको पुरते हादरले. बिलाची रक्कम 20 लाखांच्या घरात होती. एवढे पैसे नेमके उभे करायचे कसे? हा मोठा प्रश्न रॉक डिसुझा याच्यासमोर होता. त्यातच त्याची पत्नी सेलिन मात्र त्याला समजून घेत नसे. 20 लाखांच्या मालमत्ता कराची रक्कम भरण्यासाठी घर विकण्याचे रॉकचे मत होते. 


पण सेलिन यासाठी तयार नव्हत्या. याच कारणावरुन रविवारी देखील दोघांमध्ये भांडण झाले. भांडण एवढे वाढले, की दोघेही हमरी-तुमरीवर उतरले. त्यातच रागाच्या भरात रॉकने आपल्या पत्नीचा गळा दाबला. सेलिनने सुटका करुन घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यात सेलिनचा मृत्यू झाला.

पत्नीची हत्या केल्यानंतर रॉक बराच वेळ तिच्या शेजारीच बसून होता. त्यानंतर त्याने त्यांच्याच आवारात असलेल्या छोटूलाल कनोजिया नावाच्या इस्त्रीवाल्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने सेलिनची बहीण जेसींताला सर्व हकिगत सांगून तिला बोलावून घेतले. सेलिनला व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


व्ही. एन. देसाई रुग्णालयातून फोन आला, त्यानंतर पोलिसांचे पथक रुग्णालयात गेले. घडलेला प्रकार समजताच आरोपीला अटक करण्यात आली.


महादेव वाव्हळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकोला पोलिस ठाणेहेही वाचा

घाटकोपरमध्ये पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

का केली या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय