'करण ओबेरॉयवरील गुन्हा मागे घे', तक्रारदार महिलेला धमकी

तक्रारदार महिला ही शनिवारी नेहमीप्रमाणे मार्निंग वॉक करत असताना. या चौघांनी दुचाकीवरून येऊन तिच्यावर चाकूनं हल्ला चढवला.

'करण ओबेरॉयवरील गुन्हा मागे घे', तक्रारदार महिलेला धमकी
SHARES

अभिनेता करण ओबेरॉय प्रकरणातील तक्रारदार महिलेला दबाव टाकून तक्रार मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी तिच्यावर हल्ला करणाऱ्या चौघांना सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे. झिशान अहमद (२१), अराफत अहमद (२१), जितीन संतोष (२२), अल्तमाश अन्सारी (२३अशी या आरोपींची नावं आहेतया प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


बलात्कार केल्याचा आरोप

करण ओबेरॉयवर एका ३४ वर्षीय महिला ज्योतिषीनं तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होतात्यानंतर करण ओबेरॉयला अटक करण्यात आली आहेया प्रकरणातील तक्रारदार महिला ही शनिवारी नेहमीप्रमाणं मार्निंग वॉक करत असतानाया चौघांनी दुचाकीवरून येऊन तिच्यावर चाकूने हल्ला चढवलाऐवढंच नव्हंत, तर त्यापैकी एकानं तिच्या दिशेनं एक कागद फेकला व त्यात ‘केस मागे घे’ असं लिहलेलं होतंया प्रकरणी महिलेनं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.


महिलेवर हल्ला 

ज्या ठिकाणी पीडित महिलेवर हल्ला झाला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही तपासलं असता आम्हाला बाईकचा नंबर मिळालात्याआधारे आम्ही बाईकचा मालक झिशान अहमद याला अटक केलीत्याच्या चौकशीतून इतरांची नावं पुढे आली.  या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.



हेही वाचा -

मिठी नदीला पर्यटन स्थळ करण्यासाठी महापालिका करणार २१ कोटी खर्च

महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थांनतर ई-सिगरेटवर बंदी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा