४ बोगस डॉक्टरांना अटक

कोणतीही अधिकृत पदवी अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसलेले काही बोगस डॉक्टरांनी सायनमध्ये दवाखाना सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाला मिळाली होती.

४ बोगस डॉक्टरांना अटक
SHARES

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या चार बोगस डॉक्टरांना मंगळवारी अटक केली आहे. राकेश रघुनाथ तिवारी, दलसिंग यादव, मोतीलाल मौर्य, अनिलकुमार बिंद अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांकडे वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना, पदवी अथवा कुणाचीही मेडिकल कौन्सिलकडे नोंद नसल्याचे आढळले आहे. 

मुंबईत मागील तीन महिन्यांत १९ बोगस डॉक्टरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. कोणतीही अधिकृत पदवी अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसलेले काही बोगस डॉक्टरांनी सायनमध्ये दवाखाना सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाला मिळाली होती. प्रभारी पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या पथकांनी सायनमधील जय भारत माता नगर आणि ओमप्रकाश सोसायटी हा झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. एकाच वेळी चार ठिकाणी छापा टाकून चार बोगस डाॅक्टरांना अटक केली. पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या बोगस डॉक्टरांकडून पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या, औषधे, इंजेक्शन आणि उपचार करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले आहे.  गेल्या तीन वर्षांपासून या बोगस डॉक्टरांनी दवाखाने सुरू होते. आरोपींना महानगर दंडाधिकाऱ्यांनी १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा -

नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांची होणार डीएनए चाचणी, महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य

मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये कांद्याची चोरी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा