वीज चोरीच्या ठेकेदारीवरून मालाडमध्ये एकाची हत्या


वीज चोरीच्या ठेकेदारीवरून मालाडमध्ये एकाची हत्या
SHARES

वाढीव वीज दरावरून आधीच वातावरण चांगलेच तापले असताना. पश्चिम उपनगरात अशाच वीज चोरीच्या ठेकेदारीतून मालाडमध्ये एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद आमीन ताज मोहम्मद खान असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी नदीम मुन्शी, सोहेल मुन्शी, शफीक मुन्शी, रिजवान मुन्शी आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचाः-तुटपुंजं अधिवेशन: चर्चा तर व्हायलाच हवी..!

गोरेगाव लिंक रोड येथील लिलाताई गल्ली, भगतसिंग नगर येथे मृत मोहम्मद आमीन ताज मोहम्मद खान (३८)हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. आमीन हा घर बांधकाम करतो. या परिसरातील झोपडपट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज  चोरी होते. त्याच्यावरील वरदहस्तावरून आमीन आणि आरोपी नदीम यांच्यात पूर्ववैमन्यस्य होते. याच वादातून गुरूवारी रात्री नदीम आणि त्याच्या भावांनी आमीनची हत्या केली. विशेष म्हणजे या हत्येच्या कटात नदीमने एका अल्पवयीन मुलाचा देखील वापर केला आहे. हत्या करण्यापूर्वीच आरोपींनी त्याच्या कुटुंबियांना गावी पाठवल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही पूर्वनियोजत कट रचून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.  आरोपी नदीमवर या पूर्वीही ३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. त्याच्यावर मारहाण, धमकावणे, अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी या पूर्वीच या परिसरात होणाऱ्या वीजबिल चोरीची माहिती संबधित कंपन्यांना देत, पोलिसात तक्रार करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र संबधित कंपन्यांना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा