फसवणुकप्रकरणी एकाच कुटुंबातल्या चार व्यावसायिकांना अटक


SHARE

व्यवसायासाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांची परतफेड न करता फसवणूक करणाऱ्या गिरगावातल्या एकाच कुटुंबातील चार व्यावसायिकांना अार्थिक गुन्हे शाखेने अटक केली अाहे. किरीट सत्रा, भरत सत्रा, कल्पेश सत्रा अाणि हरेश सत्रा अशी या अटक केलेल्या चार अारोपींची नावं अाहेत. ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अार्थिक गुन्हे शाखेनं त्यांच्याविरोधात भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


जयेश गाला यांनी केली तक्रार

परदेशातून पेपर अायात करण्याच्या नावाखाली हरेश यांना अापल्याच समाजातील जयेश गाला (४२) यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. गिरगावात राहणाऱ्या जयेश यांनी हरेशवर विश्वास ठेवून दीड टक्के व्याजाने ही रक्कम दोन महिन्यांसाठी दिली. पण दोन महिने उलटून गेले तरी पैसे परत मिळवण्यासाठी जयेश गाला यांनी तगादा लावला. हरेश सत्रा यांनी मात्र अनेक कारणे देत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली अाणि काही कालावधी मागून घेतला.


गोदाम विकण्याच्या नावाखालीही लुटले

रक्कम न मिळाल्यामुळे जयेश गाला यांना अापले माझगाव येथील गोदाम विकण्याचे अामीष दाखवून पुन्हा त्यांच्याकडून तीन कोटी रुपये उकळण्यात अाले. सत्रा कुटुंबियांनी दोन लाखांचे २५ धनादेश जयेशला दिले, मात्र खात्यात पैसे नसल्यामुळे ते वठले नाहीत. इतकंच नव्हे तर जयेश गाला यांच्या वडिलांकडूनही सत्रा कुटुंबियांनी सहा कोटी रुपये उकळले अाहेत. एक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर जयेश गाला यांनी अार्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या