ठाण्यातील येऊर तलावात २४ तासात चार बळी

घाबरलेल्या इतर मित्रांनी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला बोलावले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. मात्र, यश मिळत नसल्याने टीडीआरएफ टीमला बोलावण्यात आलं.

ठाण्यातील येऊर तलावात २४ तासात चार बळी
SHARES

ठाण्यातील (thane) येऊर तलाव (Yeoor Lake) हा मृत्यूचा सापळाच बनला आहे. येऊर तलावात २४ तासात चार जणांचा बळी (death) गेला आहे. या घटनेनंतर येऊर येथील वन अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी गस्त वाढवली आहे.

येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या नील तलावात (nile lake) पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा रविवारी बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. 

रविवारी या तलावात सेंट्रल मैदान येथील पोलीस वसाहतीमध्ये राहणारा प्रसाद पावसकर (१६) आणि राबोडी भागात राहणाऱ्या जुबेर सय्यद (२१) याचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास येऊरच्या पाटोणपाडा येथील ५ ते ६ मुलं या तलावात पोहण्यासाठी आली होती. त्यापैकी तेजस प्रमोद चोरगे (१७) आणि ध्रुव कुळे (१७) या दोघांनी प्रथम तलावात उडी घेतली. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पुन्हा वर आलेच नाहीत. 

घाबरलेल्या इतर मित्रांनी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला बोलावले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. मात्र, यश मिळत नसल्याने टीडीआरएफ टीमला बोलावण्यात आलं. त्यांनी अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या मदतीनं सहाय्याने दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तेजसचा मृतदेह बाहेर काढला. मात्र ध्रुवचा मृतदेह सापडला नाही. अखेर शोध पथकाने स्कुबा ड्राइव्हचा वापर करून संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ध्रुवचा मृतदेह शोधून काढला.

नील तलाव हा प्रतिबंधित क्षेत्रात येतो. मात्र, तरीही अनेक तरुण या तलावात पोहण्यासाठी येतात आणि जीव गमावतात. त्यामुळे हे सर्व रस्ते बंद करून तिथे पोलीस किंवा सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी करण्यात येत आहे. 



हेही वाचा -

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा