सोलापूरात बँक फोडण्याचा प्रयत्न; चौकडीला मुंबईत अटक


SHARE

सोलापूरातील टेंभूर्णी पोलिस ठाणे परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडियाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना मुंबई खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. आमुरुद्दीन जहिर शेख (२४), नाजीर ओनिस शेख (३५), साजन मोहबुल शेख (३४), सौदागर समशेर शेख (३२) अशी या आरोपींची नावे आहेत. अारोपींचा ताबा सोलापूर पोलिसांनी घेतला आहे.


चोरीचा अयशस्वी प्रयत्न

मूळचे झारखंडचे असलेले आरोपी उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध व्यवसाय करण्याच्या बहाण्याने विविध राज्यात जाऊन पाळत ठेवतात. परिस्थितीचा अंदाज घेऊन तेथील बँकातील तिजोरी तोडून चोरी करून पसार होतात. मे महिन्यात ही टोळी सोलापूरात आली होती. आंबे विक्रीच्या बहाण्याने या टोळीने स्टेट बँकेसमोर गाळा भाड्याने घेतला होता. काही दिवस बँकेची संपूर्ण माहिती गोळा करून या चैाघांनी बँकेतील स्ट्राँग रुम तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आलं. मात्र हा सर्व प्रकारबँकेतील सीसीटिव्हीत कैद झाला.


सीसीटिव्हीच्या मदतीने माग

या सीसीटिव्हीच्या मदतीने सोलापूर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाची मदत घेतली. या प्रकरणी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने या चौघांना अटक करत त्यांचा ताबा सोलापूर पोलिसांना दिला आहे. यातील आमरुद्दीन शेख हा मजुरी करतो. तर नाजीर शेख हा नारळचा व्यवसाय करतो. तर इतर दोन आरोपींचा मच्छी विक्रीचा व्यवसाय अाहे.हेही वाचा-  

दिवा स्थानकात प्रवाशाला मारहाण, थोडक्यात वाचला डोळा

रेल्वे प्रवाशांना लुटणारे चोरटे जेरबंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या