सावधान ! कोविड अधिकारी असल्याचे सांगून उद्या तुमचीही होऊ शकते फसवणूक

तोतया कोविड१९ ऑफिसरांनी एका तरुणाकडून तब्बल ५४ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सावधान ! कोविड अधिकारी असल्याचे सांगून उद्या तुमचीही होऊ शकते फसवणूक
SHARES

मुंबईत आधीच कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावामुळे नागरिक आणि प्रशासन हैराण झाले असताना.  या परिस्थितीचा फायदा घेत अनेक भूरट्या चोरांनी नागरिकांची फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका बोगस कोविड अधिकाऱ्याच्या मुस्क्या चेंबूर पोलिसांनी आवळल्या आहेत. तोतया कोविड१९ ऑफिसरांनी एका तरुणाकडून तब्बल ५४ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका जणांना अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

हेही वाचाः- डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

चेंबूर येथील सरस्वती विद्यालयाजवळील रस्त्यावरून अब्दुल शेख हा ३० जून रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास जात होता. त्यावेळी दोघांनी त्याची वाट अडवली.  त्या दोघांनी अब्दुलला स्वतःची ओळख ही कोविड ऑफिसर म्हणून सांगितली. तसेत ते दोघे अब्दुल शेख यांच्याजवळ असलेल्या सामानाची तपासणी केली. अब्दुल शेखजवळ असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम घेऊन हातचलाखीने त्याचा पिन नंबर घेऊन अब्दुल शेख यांच्या अकाउंटमधून ५४ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर अब्दुलने हा सर्वप्रकार चेंबूर पोलीस ठाण्यात सांगितला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.

हेही वाचाः- Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

सीसीटीव्हीच्या सहाय्याने घटनास्थळी पोलिसांना एक होंडा सिटी गाडी दिसली, याच गाडीमध्ये हे दोन्ही भामटे आले होते. याचा तपास सुरू करत मुंबई पोलीस आरोपी पर्यंत पोहचले.सोहन वाघमारे असे आरोपीचा नाव आहे. चेंबूर पोलिसांनी सोहन वाघमारेला अटक केली असून भा.द.वि कलम ४२०,३४  अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस पुढील तपास करत आहेत तसेच त्याच्या जोडीदाराचा शोधसुद्धा घेत आहेत. सोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीसुद्धा सायन पोलीस स्टेशन आणि नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा