बिग बॉस विजेता प्रिन्स नरुलाच्या नावाने फसवणूक, कोलकाता मधील निर्मात्यावर गुन्हा दाखल

विशेष म्हणजे एका कार्यक्रमात त्याने नरुलाला खोटी माहिती देऊन तक्रारदार मुलाची भेट देखील घडवून दिली होती.

बिग बॉस विजेता प्रिन्स नरुलाच्या नावाने फसवणूक, कोलकाता मधील निर्मात्यावर गुन्हा दाखल
SHARES

बिग बॉस विजेता  प्रिन्स नरुलाच्या नावाने परळमधील एका मुलाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कृष्ण  कुमारशर्मा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याने स्वत:ची ओळख ही मुलाला म्युझिक डायरेक्टर अशी सांगितली होती. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात त्याने नरुलाला  खोटी माहिती देऊन तक्रारदार मुलाची भेट देखील घडवून दिली होती.

हेही वाचाः- महिलांना लोकल प्रवास: रेल्वेला राज्य सरकारच्या उत्तराची प्रतिक्षा

कृष्णकुमार शर्मा हा कोलकाता येथील अलीपुर येथील रहिवासी आहे. तर तक्रारदार यांचा मुलगा प्रसाद हा उदयोन्मुख मॉडेल व म्युझिक आर्टिस्ट आहे. बंगलोर येथे एका कार्यक्रमादरम्यान राज नावाच्या एका परिचित व्यक्तीने  कोलकाता येथील कृष्णकुमार नावाच्या निर्माता सोबत प्रसादची  ओळख करून दिली होती. त्यावेळी म्युझिक अल्बम बनवण्याच्या नावाखाली शर्माने त्याच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. म्युझिक अल्बम झाल्यानंतर तो सात लाख रुपये परत करणार होता. मात्र पैसे घेतल्यानंतर शर्मा प्रसादला टाळू लागला. त्याचे फोनही स्विकारणे त्याने बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसादने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्यानुसार मुलाची आई शीतल मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपी कृष्ण  कुमारशर्मा हा इव्हेंट  मॅनेजर  असून त्याने प्रिन्सच्या नावाचा गैरवापर केल्याचे निश्पन्न होत आहे.

हेही वाचाः- केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

  शर्मा याने प्रसादला आपण प्रिन्ससोबत अमेरिकेत अल्बम करत असून त्यासाठी आपल्याला पंधरा लाख रुपये कमी पडत आहे जर ५ लाख रुपये गुंतवले तर तुला परतावा म्हणून सात लाख रुपये देण्यात येतील, असे आमिष दाखवले होते. प्रसाद व त्याच्या आईला यावर विश्वास बसला नाही. अखेर शर्मा याने प्रसादला अंधेरी येथे  तुमचा इमारतीजवळ बोलून घेतले. त्यावेळी आरोपीने प्रसाद हा त्याच्या अल्बम मध्ये गुंतवणूक करण्यास  तयार असल्याचे सांगितले होते.  प्रिन्सला भेटल्यानंतर प्रसाद व त्याच्या आईचा विश्वास बसला अखेर २०१८ मध्ये त्यांनी शर्मा कडे पाच लाख रुपये गुंतवले. पैसे मिळाल्यानंतर शर्मा ने प्रसाद व त्याचा आईला टाळण्यास सुरुवात केली.  आखे गेल्यावर्षी तक्रारदाराने या प्रकरणी तक्रार केली.  पण शर्मा याने पैसे येणार असल्याचे आश्वासन दिले.  अक्षरा नुकतीच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने  प्रिन्सशी संपर्क साधला असता शर्मा त्याच्यासोबत काम करणार होता पण ते काम होऊ शकले नाही.  फसवणुकीचे  कळल्यानंतर प्रिन्सने तक्रारदाराला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे याप्रकरणी प्रिन्सचा कोणताही सहभाग असल्याचे आढळून आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय