कार अपघातात तीन मित्रांचा मृत्यू

 Malad
कार अपघातात तीन मित्रांचा मृत्यू
कार अपघातात तीन मित्रांचा मृत्यू
See all

मालाड पश्चिम - मालवणी परिसरात राहणाऱ्या 3 मित्रांचा एका अपघातात मृत्यू झाला. 17 जानेवारीला हा अपघात झाला. एका वेबसाईटवर आवडलेली एक कार खरेदी करण्यासाठी हे तिघं नाशिकला गेले होते. कार बघितल्यानंतर ते परतत असताना त्यांची कार ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला. संजय शुक्ल, समीर शेख अशी या दोघांची नावं आहेत. त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात आले. तिसरा मित्र आसिफ खत्री हा गाडी चालवत होता. तो गंभीर जखमी झाला. त्याला केईएम रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण, उपचारादरम्यान 21 जानेवारीला आसिफचा देखील मृत्यू झाला.

Loading Comments