राजस्थानमधील हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मुंबईत बेड्या

माहिती देणाऱ्यास राजस्थानच्या चितोडगढ पोलिसांनी २ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवले आहे.

राजस्थानमधील हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मुंबईत बेड्या
SHARES

राजस्थानमध्ये हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने मिरारोड परिसरातून अटक केली आहे. वरूण व्यास असे या आरोपीचे नाव आहे. हत्याकरून वरून हा मुंबईत लपवून बसला होता. त्याच्या विरोधात या पूर्वीही सहा गुन्हे नोंद असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्याची माहिती देणाऱ्यास राजस्थानच्या चितोडगढ पोलिसांनी २ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवले आहे.

हेही वाचाः- मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली,  शहरातील सर्वाधिक खराब एक्यूआयची नोंद

मूळचा राजस्थानच्या चितोडगढचा रहिवाशी असलेल्या वरूण व्यासने सांवलियाजी राजकिय सामान्य चिकित्सालय येथे भागीदारीत कॅन्टीस सुरू केले होते. तेथे काम करणाऱ्या करण मेहर नावाच्या कामगाराने वरूण आणि त्याच्या सहकाऱ्याकडे थकीत वेतन आणि दिवाळीत सुट्टीसाठी तगादा लावला होता. यातून वरूणने त्याला जातीवाचर शिविगाळ करत, मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या करणचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर चितोडगढ पोलिस ठाण्यात वरूण विरोधात ३२३,३४१, ३०२ भा.द.वि सह अनुसुचित जाती व जमाती अधिनियम१९८९ कलम ३-(१),(आर),३(१)(एस), ३(१) (व्हि) अन्वेय गुन्हा नोंदवून वरूनचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी वरूणने नाव बंदलून मुंबईत वास्तव्य सुरू केले.

हेही वाचाः- संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी

दरम्यान १५ डिसेंबर रोजी दहिसर चेक नाका येथे मुंबई येणाऱ्या वाहनांची पोलिसांनी तपासणी सुरू केली होती. त्यावेळी नाकाबंदी वरूणच्या गाडीला पोलिसांनी इशारा करून थांबण्यास सांगितले. मात्र वरूणने गाडी न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनी पाठलाग करून वरूणला ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत वरूणवर मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यातसहा गुन्ह्यांची नोंद असून सध्या राजस्थान येथील एका हत्येच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा असल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला पुढील तपासासाठी त्याचा ताबा राजस्थानच्या तितोडगढ पोलिसांना दिला जाणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा