कुरारमध्ये पेट्रोलपंपवर दरोडा टाकण्याचा प्लान फसला

कुरारच्या अरूणकुमार वैद्य मार्गावर ही टोळी संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री या आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र आरोपींना पोलिसांनी रचलेल्या सापळ्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या पाठलागात या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं.

कुरारमध्ये पेट्रोलपंपवर दरोडा टाकण्याचा प्लान फसला
SHARES

कुरारच्या अरूणकुमार वैद्य मार्गावरील सीएनजी पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तिघांना कुरार पोलिसांनी अटक केली. या तिघांचे इतर चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. प्रतिक पावणेकर (२०), विकास राजू घुमाने (२४) आणि विशाल तनवाणी (२५), अशी या आरोपींची नावे आहेत. या टोळीने मालाडमध्ये एका व्यावसायिकाला रात्रीच्या वेळीस अडवून त्याच्याकडून १५ लाख रुपयांची रोकड लुबाडल्याचं चौकशीत पुढे आलं आहे

'अशी' झाली अटक

कुरारच्या अरूणकुमार वैद्य मार्गावर ही टोळी संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री या आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र आरोपींना पोलिसांनी रचलेल्या सापळ्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या पाठलागात या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं.

कोण गेले पळून?

मात्र, या टोळीतील सतीशभाई इंद्रेकर (३०), सिद्धार्थ उर्फ नरसिंम्हा इंद्रेकर (२५), हिंमत घमंडे (५०), रोजनीस घुमाने (२५) हे आरोपी पळण्यात यशस्वी झाले. या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

१७ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद

याच टोळीने ६ एप्रिल रोजी मालाड रेल्वे स्थानकाजवळ एकाला लुबाडलं होतं. देवेंद्र जालान (५३) हे व्यावसायिक १५ लाखांची रोकड रिक्षाने घरी घेऊन जात असताना रिलायन्स एनर्जी आँफिससमोरील शौचालयाजवळ रिक्षा चालकांशी वाद घालून या टोळीने जालान यांच्याजवळील रोकड लंपास केली होती. या चोरीची अटक आरोपींनी कबूली दिली आहे. या टोळीवर १७ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.हेही वाचा-

पाॅलिसीवर बोनसच्या आमिषाने वृद्धांना गंडवणाऱ्या तिघांना अटक

वयोवृद्ध महिलेची हत्या करणारे आरोपी जेरबंदRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा