भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

 Mira Bhayandar
भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

भाईंदरमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मागील आठ महिन्यांपासून या मुलीवर या नराधमांनी अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

या प्रकरणी अमर मुंशी सिंह(20), सुनील हरीराम यादव(27), राजू मनोज पटेल(19), सुनील वेदपाल वोथ(19) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे या नराधमांनी या अल्पवयीन मुलीला विविध भागांत घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीला उलट्या सुरू झाल्या. जेव्हा घरचे या मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या घरच्यांनी आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. दरम्यान या आरोपींवर कलम 76(2), 377, 506 आणि पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading Comments