‘या’ कुख्यात गुंडाने जेलमधून कर्नाटकातील व्यावसायिकाचा काटा काढला

बचकानाच्या एका हस्तकाचा या प्रकरणात हात असून तो मुंबईत वास्तव्यास असल्याचे कळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी मुंबई गाठत गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांची मदत घेतली

‘या’ कुख्यात गुंडाने जेलमधून कर्नाटकातील व्यावसायिकाचा काटा काढला
SHARES

कर्नाटकच्या धारवाड येथे एका बांधकाम व्यावसायिकाची अज्ञात व्यक्तींनी ६ आँगस्ट २०२० रोजी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्ये प्रकरणी कर्नाटकच्या ओल्ड हुबळी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. या हत्याकांडामागे कर्नाटकमधील कुख्यात गुंड युसुफ सुलेमान कादरी उर्फ युसुफ बचकाना याचा हात असल्याचे निदर्शनास आले. बचकानाच्या एका हस्तकाचा या प्रकरणात हात असून तो मुंबईत वास्तव्यास असल्याचे कळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी मुंबई गाठत गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांची मदत घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्या आरोपीस बेड्या ठोकत त्याचा ताबा कर्नाटक पोलिसांना दिला आहे. राजेंद्र रावत उर्फ राजू नेपाली असे या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचाः- बनावट पासपोर्टप्रकऱणी कुख्यात गुंड एजाज लकडावालावर नवा गुन्हा

एकेकाळी कुख्यात गुंड छोटा राजनसाठी काम करणारा कर्नाटकचा गुंड युसुफ बचकाना तुरुंगातूनही सूत्र हालवत असल्याचे पून्हा एकदा पुढे आले आहे. युसुफवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या युसुफला म्हैसूरच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र कारागृहात बसूनही युसुफ हा आपली टोळी चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. आर्थिक व्यवहारातून युसुफच्या सांगण्यावरून  त्याच्या हैद्राबाद आणि मुंबईतल्या हस्तकांनी ६ आँगस्ट रोजी कर्नाटकचा बांधकाम व्यावसायिक इरफान अल्लाबक्ष हंचनाल उर्फ अलियास उर्फ फ्रुट इरफान याची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकऱणा ओल्ड हुबळी पोलिसांनी १४३,१४७,१४८,३०७,१४९,३०२ भा.द.वि कलमांसह ३, २५ भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. पोलिस तपासात या मागे युसुफचा हात असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचाः- कुख्यात गुंड छोटा शकीलच्या बहिणीचे निधन

पोलिसांनी युसुफच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवल्यानंतर त्याता मुंबईतील हस्तक हा वारंवा त्याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कर्नाटक पोलिस त्याच्या शोधात मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांना त्या हस्तकाला पकडण्यासाठी मदत मागितल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गवस, अतुल डहाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत, अतुल आव्हाड, आशिष शेळके, पोलिस उपनिरीक्षक हेमंत गिते, हरेष पोळ आणि इतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला दहिसर येथे सापळा रचून अटक केली. या हत्याकांडमध्ये युसुफने आरोपीला गुन्ह्यांची माहिती देत, शूटर पुरवण्यासाठी गुन्ह्यांपूर्वी २ लाख आणि गुन्हा घडल्यानंतर १० लाख दिल्याचे निष्पन्न झाले. हा आरोपी या पूर्वी मुंबईच्या बोरिवली, कस्तुरबा,वनराई, पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यता आले आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा