घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी, ८ जणांना अटक

कमी वर्दळीच्या ठिकाणी गाड्यांचा आडोसा घेऊन भरलेल्या भरलेल्या सिलेंडरमधून लोखंडी नळीद्वारे १ किलोचा गॅस रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायचे. त्यानंतर तो सिलेंडर काळ्या बाजारात विकायचे.

घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी, ८ जणांना अटक
SHARES

मुंबईत गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडालेले असताना घरगुती गॅसमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीचा मुंबईच्या प्राॅपर्टी सेलच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जगदिश बिशनोई, अशोक बिशनोई, विकास गोदारा, विकास जानी, बुध्दराम बिशनोई, रामसरूप बिशनोई, सूरेश बिशनोई, गॅनमल बिशनोई अशी या आरोपींची नावे आहेत.


सिलेंडरमधून गॅस काढायचे

गावदेवी परिसरात एका गॅस एजन्सीसाठी हे आरोपी सिलेंडर नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम करायचे.  कमी वर्दळीच्या ठिकाणी गाड्यांचा आडोसा घेऊन भरलेल्या भरलेल्या सिलेंडरमधून लोखंडी नळीद्वारे १ किलोचा गॅस रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायचे.  त्यानंतर तो सिलेंडर काळ्या बाजारात विकायचे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या प्राॅपर्टी सेलला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मलबार हिल येथून काही आरोपींना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या चौकशीतून हा सर्व प्रकार पुढे आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींना अटक केली.


७७ सिलेंडर हस्तगत 

मागील काही दिवसांपासून हे गैरप्रकार करत असल्याची कबुली आरोपींना दिली आहे. पोलिसांनी या टोळीकडून ३ टेम्पोतील ७७  गॅस सिलेंडर हस्तगत केले आहेत. या सात जणांवर पोलिसांनी ३७९,२८५,२८६,३४ भादवि कलमांसह ३,७,८,९ जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



हेही वाचा  -

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: आरोपींना ३ दिवस पोलिस कोठडी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा