डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: आरोपींना ३ दिवस पोलिस कोठडी

‘१ वर्ष शिल्लक असून तुला प्रॅक्टीस पूर्ण करून देणार नाही, ओटी मध्ये पाय ठेवू देणार नाही, वैदयकिय शिक्षण पूर्ण करू देणार नाही अशा धमक्या दिल्या, त्यामुळं पायल मानसिक तणावात होती.

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: आरोपींना ३ दिवस पोलिस कोठडी
SHARES

डॉ. पायलनं केलेल्या आत्महत्येमुळे मुंबईसह महाराष्ट्रातलं वातावरण सध्या तापलं आहे. समाजात जातीपातीच्या भिंती आजही किती भक्कम आहे हे या निमित्तानं पुन्हा दिसून आलं. पायल आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पायलची सहकारी मैत्रिण डॉ. स्नेहल हिच्यासह पायलची आई, पती आणि वडिलांचा जबाब नोंदवला आहे.  


पदव्यूत्तर शिक्षण

मूळ जळगावची रहिवासी असलेली डॉ. पायल ही पालिकेच्या नायर रुग्णालयात १ मे २०१८ पासून पदव्यूत्तर शिक्षण घेत होती. पायल ही 'आदीवासी तजवी  भिल्ल' समाजाची असल्याचे ती आरक्षित जागेवर प्रवेश मिळाला होता.  हे कळाल्यानंतर तीन ही आरोपी महिला डॉक्टर हेमा अहुजा, भक्ती मेहार, अंकिता खंडेलवाल या तिला जातीवाचर टोमणे मारू लागल्या. ऐवढ्यावरच न थांबता. या तिघी ही पायलला रुग्णालयातील पेशन्ट, त्याच्या नातेवाईकासमोर ओरडायच्या, तसेच व्हॉट्सअॅपवर बनवण्यात आलेल्या ग्रुपवर ही तिला टार्गेट केलं जायचं. तसंच, प्रशिक्षणादरम्यान, पायलला ऑपरेशन थेअटरमध्ये येऊ द्यायचे नाही. अनेकदा या तिघींना पायला चुकीचे रिमार्क ही द्यायचे. रोजच्या या त्रासाला कंटाळून पायल वैद्यकिय शिक्षण सोडण्यास निघाली होती. मात्र, आईकडं तिनं भावनांना वाट मोकळी केल्यानंतर आई तिची समजूत काढायची.


कर्करोगावर उपचार

दरम्यान ऑक्टोंबर २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत अबेदा या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी नायर रुग्णालयात येत होत्या. त्यावेळी अबेदा यांच्यासमोर ही पायलला तिन्ही डॉक्टर अपमानीत करायचे. अनेकदा या तिघींना पायलची ड्युटी वाढवून तिला चार-चार दिवस हॉस्टेलवर सोडलं जात नव्हतं. याबाबत पायलनं घरातल्यांच्या मदतीनं १३ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडं लेखी तक्रार अर्ज घेऊन गेली होती. मात्र, पती सलमाननं या तक्रार अर्जामुळं पायलला आणखी त्रास होऊ शकतो. त्यामुळं तो अर्ज देण्यास विरोध केला. त्यानंतर अबेदा यांनी हॉस्टेल वार्डनपासून लेक्चरर यांची भेट घेऊन तक्रार केली असता. सर्वांनी उडवा उडवीची उत्तरे देत, या प्रकरणाकडं काना डोळा केल्याचं पायल यांची आई अबेद यांनी सांगितलं.


तक्रारीनंतर त्रास कमी

अबेद यांनी तिन्ही डॉक्टरांची केलेल्या तक्रारीनंतर पायल यांनी २२ मे रोजी आई अबेद यांना दुपारी फोन केला होता. त्यावेळी तक्रारीनंतर त्रास कमी नाही. तर वाढल्याचं सांगितलं. सिनिअर डॉक्टरांनी पायलला बोलवून ‘१ वर्ष शिल्लक असून तुला प्रॉक्टीस पूर्ण करून देणार नाही, ओटीमध्ये पाय ठेवू देणार नाही, वैदयकिय शिक्षण पूर्ण करू देणार नाही अशा धमक्या दिल्या. त्यामुळं पायल मानसिक तणावात होती.  या नैराक्षेतून पायलनं २२ मे रोजी रात्री ९ वाजता ओढणीच्या मदतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली.


तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा

पायलनं आत्महत्या केल्यानंतर तिन्ही डॉक्टर पायलच्या त्या खोलीत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पायलनं लिहिलेल्या आत्महत्यापूर्वीची चिठ्ठी काढून घेतल्याचा आरोप पायलच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा नोंद झाल्याचे कळताच. तिघीही हॉस्टेलमधून फरार झाल्या, पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर तसंच, त्याचं कुटुंबिय ही घर बंद करून भूमिगत झालं होतं. तिन्ही आरोपी अटकपूर्व जामीन घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत मेहर आणि हेमाला मुंबईतून तर अंकिताला पुण्यातून अटक केली. या तिघींही सिनिअर डॉक्टर असल्यामुळे डॉ. स्नेहल व्यतिरिक्त कुणीही जबाब देण्यास पुढे आलेलं नाही. या प्रकरणी तिघींना न्यायालयानं ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं ८ दिवसांच्या आत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.


हेही वाचा -

३ जूनला रंगणार प्रायोगिक नाट्य महोत्सव; अरुण नलावडे आणि निर्मिती सावंत यांना पुरस्कार

जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तोडगा काढण्याचं आश्वासन



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा