लोकलमध्ये धक्का लागल्याने तिने घेतला तरूणीला चावा

कालांतराने शाब्दीक वादाचे रुपांतर हे हाणामारीत झाले. त्यावेळी समोरील तरुणीने नजरीनाच्या छातीत जोरदार मुक्के मारून तिचा हात पिरगळला. ऐवढ्यावरच न थांबता ती नजरीनाच्या हाताचा चावा घेत तिला शिवीगाळ केली.

  • लोकलमध्ये धक्का लागल्याने तिने घेतला तरूणीला चावा
SHARE

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच जागेच्या वादावरून भांडणं होताना दिसतात. लोकलमध्ये  चौथ्या सीटसाठी हाणामारी होत असते. अशीच हाणामारी पश्चिम रेल्वेच्या बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये झाली. गर्दीत धक्का लागल्यानं या महिलांमध्ये इतका वाद झाला की, वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. एकमेकांचे केस ओढण्यापासून चावण्यापर्यंत ही हाणामारी झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वायरल झालाय. नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो.


सांताक्रूझ पूर्वेला राहणारी तक्रारदार नजरीना पिल्ले (३५) १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास लोकलच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ती प्रवास करत असलेली बोरिवली स्लो लोकल प्रभादेवी ते दादर रेल्वे स्थानका दरम्यान असताना नजरीनाचा धक्का शेजारी उभी असलेल्या मुलीला लागला. त्यावरून तिने नजरीनाशी भांडण सुरू केलं. कालांतराने शाब्दीक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी समोरील तरुणीने नजरीनाच्या छातीत जोरदार बुक्के मारून तिचा हात पिरगळला. एवढ्यावरच न थांबता ती नजरीनाच्या हाताचा चावा घेत तिला शिवीगाळ केली. वेळीच महिला डब्यातील इतर महिलांनी दोघींमधील वादात उडी घेत भांडण सोडवलं.

माहिम स्थानक आल्यानंतर ती तरुणी उतरून निघून गेली. या हाणामारीत नजरीना हिच्या बोटातील सोन्याची अंगठी गहाळ झाली. या प्रकरणी नजरीनाने पुढील वांद्रे रेल्वे स्थानकात उतरून त्या अनोळखी तरुणी विरोधात वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन वांद्रे रेल्वे पोलिसांनी अनोळखी महिले विरोधात भा. दं. वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ४२७ अन्वये गुन्हा नोंदवला. मात्र हा गुन्हा वांद्रे पोलिसांनी अधिक तपासासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.हेही वाचा-

पोलिस जिमखान्यातील वाद शिगेला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील १२ हजार बेशिस्त चालकांवर कारवाई
संबंधित विषय
ताज्या बातम्या