मालगाडीखाली येऊनही 'ती' सुखरूप!


  • मालगाडीखाली येऊनही 'ती' सुखरूप!
  • मालगाडीखाली येऊनही 'ती' सुखरूप!
SHARE

देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती कुर्ला येथे अनुभवण्यास मिळाली. रेल्वे प्रशासन रेल्वे रुळ ओलांडू नका असे वारंवार सांगत असतानासुद्धा शनिवारी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर एक मुलगी रेल्वे रूळ ओलांडत होती. ही तर तिची पहिली चूक होतीच. याशिवाय ती मोबाईल फोनवर देखील बोलत होती. त्याचदरम्यान तिच्यासमोरून मालगाडी आली. याचे भान देखील तिला नव्हते.

फलाटावरील प्रवाशांनी ओरडून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती फोनवर बोलण्यात मग्न होती. तिने कुणाचेही म्हणणे ऐकले नाही. फलाटावरील एक महिला तिला वाचवायला पुढे देखील आली. हा सर्व खेळ काही सेकंदांचा होत असताना ती मुलगी अखेर गाडी खाली आली. त्यावेळी सर्वांना वाटले की तिचे जीवन संपले. मात्र काही प्रवाशांनी तिची हालचाल बघितली. त्यावेळी ती व्यवस्थित असल्याचे दिसले. तिथल्या प्रवाशांनी त्वरित रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिला राजावाडी रुग्णालयात नेले आणि उपचार करून घरी सोडण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या