पेट्रोल पंपावरील झोलचा तरुणीने केला भांडाफोड


पेट्रोल पंपावरील झोलचा तरुणीने केला भांडाफोड
SHARES

मुंबई - पेट्रोल पंपावर सामान्यांची फसवणूक होते हे आपण सगळेच म्हणतो, पण त्याकडे आपण सगळेच कानाडोळा करतो. मात्र चारकोपच्या एका तरुणीने या लुटीचा पर्दाफाश केलाय. एमी शेठ या मुलीने चारकोप इथल्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हा प्रकार उघड केला आहे.

मंगळवारी संध्याकाळी एमी चारकोप इथल्या भारत पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर गेली असताना, तिच्या पुढे पौर्णिमा नावाची दुसरी एक मुलगी पेट्रोल भरत होती. तिने गाडीत तीनशे रुपयांचं पेट्रोल भरलं. या मुलीची गाडी ही अॅक्टीव्हा असल्याने 300 रुपयांच्या म्हणजेच जवळपास चार लिटर पेट्रोलने गाडीची टाकी फुल्ल होणे अपेक्षित होते. पण तसे झालेच नाही टाकी चांगलीच रिकामी होती. तिने पेट्रोलपंप चालकाला याचा जाब विचारला. पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हे सगळं बघून एमीची चांगलीच सटकली. तिने या पेट्रोल चोरी करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेत पेट्रोल पंपावरून थेट फेसबुक लाइव्ह करत या प्रकाराला वाचा फोडली. ज्याला फेसबुकवर भरभरून प्रतिसादही मिळाला.


हे फेसबुक लाइव्ह पेट्रोल कंपनीपर्यंतदेखील पोहचले. त्यानंतर त्यांनी सोमवारीच तिच्याशी संपर्क साधून तिला घेऊन त्याच पंपावर गेले. तिथे डिजिटल पेट्रोल पंपावर हा झोल शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण जुन्या पेट्रोलपंपावर असे झोल सर्रास होतात हे देखील त्यांनी मान्य केलं. चारकोपच्या या पेट्रोलपंपावर लवकरच सगळे पंप डिजिटल करण्यात येणार असून सामान्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं आश्वासन त्यांनी एमीला दिलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा