एनसीसी परेड करताना विद्यार्थिनीचा मृत्यू


एनसीसी परेड करताना विद्यार्थिनीचा मृत्यू
SHARES

माटुंगा पश्चिमेकडील डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये रविवारी सकाळी 'नॅशनल कॅडेट कोर्स' अर्थात 'एनसीसी'ची परेड करत असताना १८ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रणाली हिरे असं (१८) असं या विद्यार्थीनीचं नाव असून एफवाय बीएससी आयटीला शिकत होती.

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

डी. जी. रुपारेल कॉलजमध्ये रविवारी एनसीसीच्या परेडसाठी प्रणाली घरून म्हणजेच टिटवाळ्याहून आली होती. परेडच्या आधी प्रणाली वॉर्म अप करत होती. वॉर्म अप करताना चक्कर येऊन ती कोसळली. तिच्या मैत्रिणींनी तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले; पण ती शुद्धीवर येत नसल्याचं बघून सुरक्षा रक्षक आणि शिक्षकांच्या मदतीने तिला जवळच्या शुभदा नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं.

डॉक्टरांनी तिला तपासलं मात्र प्रणालीची स्थिती नाजूक असल्याचं समजताच त्यांनी तिला तात्काळ केईएम रुग्णालयात नेण्यास सांगितलं. सहकाऱ्यांनी तिला तात्काळ केईम रुग्णालयात नेलं, मात्र तोवर प्रणालीचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनीं तिला मृत घोषित केलं.


हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू? 

१८ वर्षीय विद्यार्थिनीचा असा अचानक मृत्यू झाल्याने डॉक्टर देखील संभ्रमात आहेत. त्यांनी तिचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला आहे. दरम्यान प्रणालीचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

प्रणालीला दोन महिन्यांपूर्वीही अशीच चक्कर आली होती आणि तिच्यावर उपचार देखील सुरु होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर तिने एनसीसीत सहभाग घेतल्याच समोर आलं आहे.  



हेही वाचा -

विद्यार्थ्याच्या हातून साफसफाई, संस्थेच्या सरचिटणीसाला अटक

300 रूपयांच्या वजडीसाठी मित्राची हत्या



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा