300 रूपयांच्या वजडीसाठी मित्राची हत्या

हा १७ वर्षीय मुलगा संपूर्ण तयारीनिशी आला होता. दोघांमध्ये पुन्हा वाद होताच १७ वर्षीय मित्राने इम्रानला भोसकले. त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. धक्कादायक म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा त्याने हा अपघात असल्याचं भासवण्यासाठी त्याचा मृतदेह ट्रॅकवर ठेवला.

300 रूपयांच्या वजडीसाठी मित्राची हत्या
SHARES

अवघ्या 300 रूपयांवरुन मित्राने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी आणि मानखुर्द स्थानकादरम्यान घडला असून या प्रकरणी जीआरपी एसटीएफने 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला पकडले आहे. विशेष म्हणजे हत्या अपघात असल्याचं भासवण्यासाठी हा मृतदेह रेल्वे ट्रेकवर टाकण्यात आला होता. सुदैवाने या प्रकाराची कुणकुण जीआरपी एसटीएफला लागली आणि सत्य समोर आलं.

9 ऑक्टोबरच्या रात्री गोवंडी आणि मानखुर्द स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर इम्रान कुरेशी (19) वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. सुरुवातीला हा रेल्वे अपघात असल्याचा जीआरपीचा कयास होता. मात्र, इम्रानच्या मानेवर असलेल्या खोल जाखमांनी जीआरपी एसटीएफचं लक्ष वेधलं आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली.


"तपास सुरु असताना एसटीएफला त्यांच्या खबऱ्याने हा अपघात नसून हत्या असल्याचं सांगितलं आणि खूनी हा १७ वर्षीय इम्रानचा मित्रच असल्याचं सांगितलं. तात्काळ एसटीएफने तपासाची चक्र फिरवली आणि १७ वर्षीय संशयित मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत मित्राने आपणच इम्रान कुरेशीची हत्या केल्याचं मान्य केल्याची माहिती मध्ये रेल्वे जीआरपीचे डीसीपी समाधान पवार यांनी दिली आहे. या प्रकरणी हत्या करण्यात आलेला चाकूदेखील जीआरपी एसटीएफने जप्त केला आहे.



का झाली इम्रानची हत्या?

बकरी ईददरम्यान मयत इम्रान कुरेशी याने 17 वर्षीय मित्राला 300 रूपयांचे मांस(वजडी) दिली होती. मात्र, महिना उलटला तरी इम्रानला काही त्याचे 300 रूपये मिळाले नव्हते. पैशावरून दोघांमध्ये बरेच वाद देखील झाले. 9 तारखेला सगळं प्रकरण मिटवण्यासाठी इम्रानने त्याच्या मित्राला गोवंडी आणि मानखुर्द स्थानकादरम्यान ट्रॅकवर बोलावले. यावेळी हा १७ वर्षीय मुलगा संपूर्ण तयारीनिशी आला होता. दोघांमध्ये पुन्हा वाद होताच १७ वर्षीय मित्राने इम्रानला भोसकले. त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. धक्कादायक म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा त्याने हा अपघात असल्याचं भासवण्यासाठी त्याचा मृतदेह ट्रॅकवर ठेवला.


पोलिस येण्याची वाट बघत आरोपी थांबला

मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकल्यानंतर हा १७ वर्षीय मुलगा तिथेच लपून बसला. इम्रानच्या शरीरावरुन गाडी गेली. त्यानंतर पोलिसांनी इम्रानचा मृतदेह उचलून नेला. हा सगळा प्रकार हा अल्पवयीन मुलगा लपून बघत असल्याची माहिती जीआरपी एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.


आरोपीला अल्पवयीन म्हणून सूट नाही?

इम्रान खानच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. कितीही गंभीर गुन्हा असला, तरी अल्पवयीन मुलांना शिक्षा होत नसून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येतं. मात्र, इम्रान खानची हत्या ही कट रचून करण्यात आली. त्याचबरोबर हत्या हा अपघात भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न अल्पवयीन मुलाने केल्याने पोलीस या अल्पवयीन मुलाला बालिक आरोपी प्रमाणेच शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं समजतंय.



हेही वाचा

धक्कादायक! वांद्र्यातील 'ती' आग लागली नाही, तर लावली!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा