सव्वा लाखांना पडला कॉफीचा 'एकच प्याला'

  Bandra
  सव्वा लाखांना पडला कॉफीचा 'एकच प्याला'
  मुंबई  -  

  'मेट्रोमोनियल साईट'वरुन महिलांना गंडा घालण्याच्या प्रमाणात सध्या चांगलीच वाढ झाली आहे. मंगळवारी खार परिसरात मेट्रोमोनियल साईटवर ओळख झालेले तरुण-तरुणी एकमेकांना कॉफी पिण्याच्या बहाण्याने भेटले खरे; पण हा कॉफीचा प्याला तरूणीला तब्बल सव्वा लाखा रुपयांना पडला.

  तरुणाने सोन्याची रिंग करून देण्याच्या नावाखाली तरूणीची सव्वा लाखांची अंगठी काढली आणि तिथून पोबारा केला. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  'मेट्रोमोनियल साईट'वर ओळख

  प्रभादेवीला राहणाऱ्या तरूणीची 'मेट्रोमोनियल साईट'वर एका तरुणाशी ओळख झाली. आर्यन पटेल या नावाने आरोपी तरुणाने अापले प्रोफाईल बनवले होते. दोघेही व्हॉट्सअॅपच चॅटींग करू लागले. बरेच महिने एकमेकांशी बोलणे केल्यावर मंगळवारी वांद्र्याच्या कार्टर रोडवरील कॅफे कॉफी डे मध्ये दोघांनी भेटण्याचे ठरवले.

  या भेटीदरम्यान आर्यनने तरूणीला अंगठी भेट करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी तिच्या बोटाच्या मापाची गरज होती. आर्यनने तरूणीच्या हातातील अंगठी मागताच तिने बिनदिक्कत त्याला अंगठी देऊन टाकली.


  फोनवर बोलण्याच्या बहाण्याने पळ

  इथपर्यंत सगळे सुरळीत सुरु होते. पण अचानक आर्यन फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेला, तो पुन्हा परतलाच नाही. तरुणीने त्याची थोडावेळ वाट पाहिली. परंतु काही तास उलटून गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने थेट खार पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू केल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली.  हे देखील वाचा -

  'मोक्ष' मिळवून देण्याच्या नावाखाली 'तो' करायचा महिलांसोबत दुष्कृत्य  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.