तळपायाला चिकटवून सोन्याची तस्करी

 Mumbai Airport
तळपायाला चिकटवून सोन्याची तस्करी

मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने आपल्या पायाला चिकटवून सोन्याची तस्करी केल्याने खळबळ उडाली. सोमवारी रात्री ही घटना घडली. थिरुपथी पलनियंडी असं या प्रवाशाचं नाव असून सिंगापूरहून मुंबईला येत होता. ही गोष्ट लक्षात येताच त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे कस्टमची नजर चुकवण्यासाठी त्याने सोन्याची बारा बिस्किटे स्वतःच्या पायाला चक्क चिकटवली होती. 


प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाच्या या बिस्किटांची किंमत 36 लाखांच्या घरात असून प्रत्येकी सहा बिस्किटे त्याने आपल्या दोन्ही पायांना चिकटवली होती. 

थिरुपथी हा सिंगापूरला आर्किटेक्चर सुपरवायझर म्हणून काम करत असून पैशांच्या मोबदल्यात त्याने ही सोन्याची तस्करी केल्याचं कबूल केलं आहे. सिंगापूरच्या कोणा मारू नावाच्या व्यक्तीचं हे सोनं असून सध्या कस्टम विभाग त्याचा शोध घेत आहे.

Loading Comments