टूथपेस्टमध्ये सापडलं सात लाखांचं सोनं


टूथपेस्टमध्ये सापडलं सात लाखांचं सोनं
SHARES

टूथपेस्ट या दात घासण्यासाठी असतात असा सर्वमान्य समज आहे. जवळपास सगळ्या टूथपेस्ट दात घासण्यासाठीच वापरल्याही जातात. पण अल्ताफ हुसेनसाठी मात्र टूथपेस्ट या दात घासण्यासाठी नाहीत. मग कशासाठी वापरतो तो टूथपेस्ट?

रविवारी मध्यरात्री अल्ताफ दुबईहून मुंबई विमानतळावर दाखल झाला. जेट एअरवेजच्या 9W057 या विमानाने तो प्रवास करत होता. विमानतळावरच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना अल्ताफच्या प्रोफाइलवरुन काहीसा संशय आला. त्यावरुन या अधिकाऱ्यांनी त्याला अडवून त्याच्या सामानाची झडती केली.

अल्ताफच्या सामानामध्ये हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल 10 टूथपेस्ट सापडल्या. एका प्रवाशाकडे एवढी टूथपेस्टची पाकिटं का? असा संशय पोलिसांना अाल्यामुळे त्यांनी अजून कसून तपास घेतला, तेव्हा त्या टूथपेस्टमध्ये चक्क सोन्याच्या चेन सापडल्या!

सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरताना दिसतात. या तस्कराने तर चक्क टूथपेस्टमध्येच सोन्याच्या चेन 'भरल्या' होत्या. 10 टूथपेस्टमधल्या 4 पेस्टमध्ये थोडी पेस्ट काढल्यानंतर त्यात चेन घुसवल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अशा 7 लाख रुपये किंमतीच्या 4 चेन पोलिसांनी या टूथपेस्टमधून हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी अल्ताफला अटक करुन त्याची रवानह

सध्या सात लाखांच्या चार सोन्याच्या चेन जप्त करण्यात आल्या असून अल्ताफला अटक करण्यात आली आहे.हेही वाचा

त्याने स्लिपरमध्ये लपवलं 14 लाखांचं सोनं!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा