त्याने स्लिपरमध्ये लपवलं 14 लाखांचं सोनं!


त्याने स्लिपरमध्ये लपवलं 14 लाखांचं सोनं!
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या चपलेतून हवाई गुप्तचर विभागाने 14 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. मोहम्मद सुफियान निजामुद्दीन असे या प्रवाशाचे नाव असून, तो श्रीलंकेचा नागरिक आहे.

रविवारी पहाटे मोहम्मद सुफियान श्रीलंकेवरुन मुंबईला आला. त्यावेळी ग्रीन चॅनलमधून तो बाहेर आला असता त्याच्या पूर्वीच्या रेकॉर्डवरुन हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता अधिकाऱ्यांचे त्याने घातलेल्या स्लिपर्सकडे लक्ष गेले. संशयावरून अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्याच्या स्लिपरमध्ये पोकळ भागात पाच सोन्याची बिस्किटे लपवल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. 500 ग्रँम वजनाच्या या बिस्किटांची किंमत सुमारे 14 लाख 75 हजारांच्या घरात आहे. तो कपड्यांचा व्यापारी असून, भारतातून कपडे घेऊन तो श्रीलंकेत विकतो.


हेही वाचा - 

महिलेच्या पार्श्वभागात सापडली आठ सोन्याची बिस्किटे

अबब ! विमानतळावरून एकाच रात्री पाच किलो सोनं जप्त

११ दिवसांत चार कोटींची सोन्याची तस्करी पकडली


तर, दुसऱ्या एका कारवाईत हवाई गुप्तचर विभागाने नसिमा गफूर मनियार नावाच्या महिलेला पकडले असून, तिच्याकडून 300 ग्रॅम वजनाची इरिडियम पावडर जप्त केली आहे. या इरिडियम पावडरची किंमत 7 लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे विमानतळावरील अधिकाऱ्यांची नजर चुकवण्यासाठी महिलेने इरिडियमची पावडर आपल्या पार्श्वभागात लपवली होती. शनिवारी रात्री ही महिला हाँगकाँगवरुन भारतात आली असता प्रोफाइलिंगवरुन तिला ताब्यात घेण्यात आले.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा