आजोबानेच केला नातीचा लैंगिक छळ

Dahisar
आजोबानेच केला नातीचा लैंगिक छळ
आजोबानेच केला नातीचा लैंगिक छळ
आजोबानेच केला नातीचा लैंगिक छळ
See all
मुंबई  -  

चारकोप पोलिसांनी 13 वर्षाच्या नातीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपी आजोबाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी कांदिवली (प.) इथल्या चारकोप गाव परिसरात राहणारी आहे. तर आरोपी आजोबा गुजरातमध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी करतो. पण मुलगी घरात एकटी असताना आरोपी आजोबा नेहमी घरी येत असे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. मात्र 3 एप्रिलला मुलीने पोटात दुखू लागल्याची तक्रार केली. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिला कांदिवलीच्या कूपर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती दोन महिन्याने गर्भवती असल्याचं समोर आलं. यासंदर्भात तिच्या आई-वडिलांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानंतर पोलिसांनी गुजरातमध्ये असलेल्या आरोपीला फोन करून कळवले की, त्याची सून आणि मुलगा आजारी असून ते रुग्णालयात दाखल आहेत. तर मुलगी घरात एकटीच आहे. हे समजताच आरोपी 4 एप्रिलला मुंबईत आला. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.