रेल्वे पोलिसांनी परत केला मुद्देमाल

 wadala
रेल्वे पोलिसांनी परत केला मुद्देमाल
रेल्वे पोलिसांनी परत केला मुद्देमाल
रेल्वे पोलिसांनी परत केला मुद्देमाल
रेल्वे पोलिसांनी परत केला मुद्देमाल
See all

वडाळा - प्रवासादरम्यान चोरीला गेलेला आणि हरवलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल बुधवारी लोहमार्ग पोलिसांनी तक्रारदारांना परत केला. तसंच लोहमार्ग पोलिसांच्या गुप्त यंत्रणेमार्फत लोकलमध्ये चोऱ्या करणाऱ्या संशयितांवर पाळत ठेवून त्यांच्या मुसक्या आवळण्यातही वडाळा लोहमार्ग पोलिसांना यश आलंय. या सराईत चोरांकडून 24 महागडे मोबाईल आणि 13 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलं. या सर्व मोबाईलची किंमत साधारण 4 लाख रुपये तर मंगळसूत्राची किंमत 38 हजार इतकी होती. संबंधित तक्रारदारांची शहानिशा करून त्यांना त्यांच्या वस्तू वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. या वेळी पोलीस कॉन्स्टेबल विजयसिंग गिरासे, सचिन दैवे, मंगेश साळवी, संतोष गव्हाणे आदीही उपस्थित होते.

Loading Comments