बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारे दोघे अटकेत

 Mankhurd
बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारे दोघे अटकेत

मानखुर्द - गुजरातमधील अवकार या नामांकित रुग्णालयात कॉल करून रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुजरात पोलिसांनी मानखुर्द येथून अटक केली आहे.

2 मार्चला एका अज्ञात इसमाने कॉल करुन ही धमकी दिली होती. याबाबत गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल करत या फोनचा तपास सुरू केला. दरम्यान, मानखुर्द परिसरात राहणाऱ्या शाहीद खान या इसमाच्या नावावर हे सिमकार्ड निघाले. मात्र आपल्याकडे असा नंबरच नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरुन याच परिसरातील वाहीद शेख या सिमकार्ड विक्रेत्याला देखील ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी गुजरातमधील साबरमती येथे नेले आहे.

Loading Comments