लाॅकडाऊनमध्ये गुटख्याची तस्करी, मानखुर्दमधून ५ लाखांचा गुटखा जप्त

लाॅकडाऊन काळात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णतहा बंदी आणल्याने या पदार्थांची मागणी वाढली. एक तंबाखूची पुढी तिपट्ट भावाने दुकानदार विकू लागले.

लाॅकडाऊनमध्ये गुटख्याची तस्करी, मानखुर्दमधून ५ लाखांचा गुटखा जप्त
SHARES

मुंबईत लाॅकडाऊनमध्ये सुंगधीत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची तस्कर चढ्या बावाने विक्री करत आहेत. अवैध रित्या मुंबईच्या मानखुर्द परिसरात हा गुटखा साठवून ठेवत असल्याची तक्रार चेंबूर गुन्हे शाखा ६ कक्षाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मानखुर्द इंदिरानगर गल्ली परिसरात छापा टाकला. पोलिसांनी या छाप्यात ५ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. तर या तस्करांनी आतापर्यंत लाँकडाऊनच्या काळात ४९ लाखांचा गुटखा छुप्या पद्धतीने विकल्याचे तपासात पुढे आले आहे.

हेही वाचाः- चार दिवसात मुंबई पोलिसांनी ३४ हजार गाड्या जप्त केल्या

  राज्यात लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून तंबाखू जन्य पदार्थाची विक्री करण्यास पूर्णतहा बंदी आहे. एरवी पानटपरीवाले छुप्या पद्धतीने सुंगधीत गुटखा, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करत होते. मात्र लाँकडाऊन काळात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णतहा बंदी आणल्याने या पदार्थांची मागणी वाढली. एक तंबाखूची पुढी तिपट्ट भावाने दुकानदार विकू लागले. तर गुटखा या आधीही छुप्या पद्धतीने विकत असल्याने गुटख्याचे भाव तर गगनाला भिडलेले होते. काही ठिकाणी सिंगल सिगारेट दुप्पटीने विकली जात होती. तर काही ठिकाणी पूर्ण पाकिटच घेण्यावर दुकानदार अडून होते. त्यामुळे या सर्व पदार्थांची मागणी ओळख घेऊन तस्करांची चांदीच झाली होती. चढ्या दराने तंबाखूजन्य पदार्थ विकून हे भूरटे चोर स्वतःचे खिसे भरत  होते. याची माहिती गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांना मिळाली.

हेही वाचाः- केवळ २ किमी परिघातच संचाराची अट रद्द

गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांनी मानखुर्दच्या इंदिरानगर गल्ली परिसरात छापा टाकून तब्बल ५ लाखांचा गुटखा जप्त केला.  याप्रकरणी पोलिसांनी राजकुमार गुप्ता (२८) याला अटक केली आहे. पोलिस तपासात त्याने आतापर्यंत संपूर्ण मुंबईक ४९ लाख १४ हजार ८७० रुपयांचा गुटखा विकल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.

संबंधित विषय