मनीष भांगलेला अटक, एकनाथ खडसेंना दिलासा !


मनीष भांगलेला अटक, एकनाथ खडसेंना दिलासा !
SHARES

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंधाप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे दाऊदच्या संपर्कात असल्याचा कथित आरोप करणाऱ्या एथिकल हॅकर मनीष भांगलेला 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच भादंवि कलम ४६८, ४७१ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ (ड) अंतर्गत त्याच्याविरोधाक कारवाई करत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्याला अटक केली होती. शुक्रवारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त ( डीसीपी) अखिलेश सिंग यांनी दिली.

मनीषने सादर केलेली कागदपत्रे तसेच मेल्स हे खोटे असल्याचं तपासात समोर आलं आहे. एवढेच नाही तर त्यातही त्याने हेराफेरी केल्याचं तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. असं करण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता याचा सध्या सायबर सेलकडून तपास सुरू आहे.

काय आहे मनीष भांगले प्रकरण?

मनीष भांगलेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संपर्कांत असल्याचा दावा केला होता. मनीष भांगलेने पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी लि. (पीटीसीएल)चे रेकॉर्ड्स हॅक करून दाऊदच्या क्लिफ्टन कराची येथील घरातील चार लॅण्डलाइन नंबरचे कॉल रेकॉर्ड हस्तगत केले होते. हे चारही नंबर दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिच्या नावावर नोंद असल्याचा मनीषचा दावा होता. एवढेच नव्हे तर या नंबरवरून भारतातील एका मोबाइल नंबरवर अनेक फोन करण्यात आल्याचा मनीषचा आरोप होता. तसेच तो नंबर एकनाथ खडसे यांचा असून त्यांना अनेक फोन करण्यात आल्याचा दावा देखील मनीषने केला होता. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी मनीषने केली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा