बेपत्ता एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याची हत्या

एचडीएफसी बॅँकेत उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेले संघवी पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीसह मलबार हिल येथे राहत होते. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास संघवी अापल्या कार्यालयातून निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून अाले. मात्र, त्यांची कार बाहेर पडल्याचं सीसीटीव्हीत दिसलं नाही. कार्यालयातून बाहेर पडण्याअगोदरचा त्यांचा मोबाइल बंद होता.

बेपत्ता एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याची हत्या
SHARES

बुधवारपासून बेपत्ता असलेले मुंबईतील एचडीएफसी बॅँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी (३९) यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तपास करत असताना नवी मुंबई पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती. त्याने हत्येची कबुली दिल्यानंतर इतर अारोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्यानंतर अाणखी ४ अारोपींना ताब्यात घेण्यात अालं. संघवी यांचा मृतदेह कल्याणच्या खाडीत टाकल्याचं अारोपींनी सांगितलं अाहे.  या हत्येमागं वैयक्तिक कारण असल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितल्याचं समजतं.


उशिरपर्यंत घरी नाही

 एचडीएफसी बॅँकेत उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेले संघवी पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीसह मलबार हिल येथे राहत होते. लोअर परेल येथील कमला मिल्समध्ये त्यांचं कार्यालय अाहे. बुधवारी सकाळी संघवी ऑफिसला गेले. मात्र, रात्री १० वाजेपर्यंत घरी न आल्यामुळं त्यांच्या पत्नीनं ना.म. जोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.


अगोदरच मोबाइल बंद 

बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास संघवी अापल्या कार्यालयातून निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून अाले. मात्र, त्यांची कार बाहेर पडल्याचं सीसीटीव्हीत दिसलं नाही. कार्यालयातून बाहेर पडण्याअगोदरचा त्यांचा मोबाइल बंद होता.  याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांना थोडा वेळ त्यांचा मोबाइल कोपरखैरणे येथे चालू झाल्याचं अाढळून अालं. त्यानंतर त्यांची गाडी कोपरखैरणे येथे सापडली होती. गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग सापडले होते.



हेही वाचा -

सर्प मित्रांकडून हिसकावून घेत सापाची हत्या; अारे काॅलनीतील घटना

महिलांच्या डब्यात घुसून तरूणाचे अश्लिल चाळे, तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा