मुंबईत पत्रकारावर जीवघेणा हल्ला


मुंबईत पत्रकारावर जीवघेणा हल्ला
SHARES

'टाइम्स नाउ'चा पत्रकार आणि त्याच्या मित्रावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. हल्ला झालेल्या पत्रकाराचं नाव हरमन गोम्स असं आहे. या हल्ल्यात हरमन आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हल्लेखोरांविरुद्ध गांवदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.


का केला हल्ला?

हल्लेखोर शनिवारी रात्री हरमन गोम्सच्या घराबाहेर त्याची वाट पाहात उभे होते. दरम्यान हरमन येताच या हल्लेखोरांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्या हल्लेखोरांनी हरमनच्या मित्राचा फोन हिसकावून नेला. मात्र या हल्ल्याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसा टाइम्स नाउवर दाखवण्यात आलेल्या एका बातमीचा राग धरत चार जणांनी हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरमनच्या म्हणण्यानुसार, आपल्या कोणत्या बातमीमुळे हल्ला झाला माहीत नाही, पण आपण प्रत्येक बातमी खात्री करूनच देतो.


फेसबुकवर टाकली पोस्ट


या हल्ल्यात माझ्या डोळयाला गंभीर दुखापत झाली असून सहा टाके पडले आहेत. या हल्ल्यामुळे माझे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहेत, असं हरमन गोम्सने आपल्या फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा