मुंबईत तीन कोटींचं हेरॉईन जप्त, महिला तस्कराला अटक

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ५० वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही महिला देशातील अंमली पदार्थांची सर्वात मोठी सप्लायर असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

मुंबईत तीन कोटींचं हेरॉईन जप्त, महिला तस्कराला अटक
SHARES

मुंबईत ३ कोटी ८ लाख १० हजार रुपयांचे किमतीचं १ किलो २७ ग्रॅम हेरॉईन (Heroin) हे अंमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या  (Mumbai Police Anti Narcotics Cell) वरळी युनिटने ही कारवाई केली आहे.

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ५० वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही महिला देशातील अंमली पदार्थांची सर्वात मोठी सप्लायर असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या महिलेला मुंबईतील प्रसिद्ध आणि हायप्रोफाईल अशा काळबादेवी परिसरातून अटक करण्यात आली आहे. काळबादेवी येथील प्रिन्सेस स्ट्रीट येथे एक महिला हेरॉईन विक्री करण्यासाठी येणार असल्याची  माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ३ मे रोजी तेथे सापळा रचला. ही महिला परिसरामध्ये एखाद्या साधारण गृहिणीसारखी वावरत होती. पोलिसांनी तिची तपासणी केली असता तिच्याकडे १ किलो २७ ग्रॅम हेरॉइन सापडलं. 

ही महिला दक्षिण व मध्य मुंबईत अंमली पदार्थांची विक्री करणारी तस्कर असल्याचं समोर आलं आहे. तिला न्यायालयात हजर केले असता, तिची रवानगी ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या बाहेरून महिलेला मोठ्या अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचंही समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय टोळीशीही तिचे संबंध असल्याची चर्चा आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे अशा मोठ्या शहरांत तस्करांना ती अंमली पदार्थांचा पुरवठा करत होती. 



हेही वाचा - 

  1. म्युकरमायकोसिसवरील उपचाराचे दर निश्चित

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा