COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हाय अलर्ट

सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात दिल्लीत (delhi) सुरू असलेल्या हिंसाचारामुळे मुंबईतही हाय अलर्ट ( high alert) जारी करण्यात आला आहे.

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हाय अलर्ट
SHARES

सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात दिल्लीत (delhi) सुरू असलेल्या हिंसाचारामुळे मुंबईतही हाय अलर्ट ( high alert) जारी करण्यात आला आहे. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (mumbai police) सतर्क झाली आहे. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निर्देशानंतर मुंबईमध्ये काटेकोर सुरक्षा करण्यात आली आहे. 

सोमवारी रात्री दिल्लीतील हिंसक आंदोलनाचा विरोध करण्यासाठी मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथे विना परवानगी काही आंदोलकांकडून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. २२ ते २५ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील १० लोकांची ओळख पटवून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिस विशेष खबरदारी घेत आहेत. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. आझाद मैदानातील नियुक्त केलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त, मुंबईत अन्य कोणत्याही ठिकाणी निषेधासाठी परवानगी देण्यात येणार नाही. दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल जवळील गेट वे ऑफ इंडियाच्या आसपास, मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. लोक व वाहनांची ये-जा रोखण्यासाठी जवळपासच्या रस्त्यांवर ब्लॉकर लावण्यात आले आहेत. 

दिल्लीच्या जफराबाद, मौजपूर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला हिंसक वळण आलं. हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांमध्ये १४४ कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  यामुळे मुंबईमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून सरकार आणि पोलीस सतर्क झाले आहेत. हेही वाचा- 

सायन उड्डाणपूल २७ फेब्रुवारीपासून ५ दिवस बंद

लोअर परळ येथे डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा