वसईमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

 Vasai
वसईमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Vasai, Mumbai  -  

मुंबईतील वसई परिसरात पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे सेक्स रॅकेट मोबाईल आणि वॉटस्अपच्या द्वारे काम करत असे.

वसईतील साईनगरमध्ये महावीर कॉम्प्लेक्स सोसायटी आहे. या सोसायटीच्या फ्लॅट क्र.007 मध्ये सेक्स रॅकेट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली असता पोलिसांना त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करताना तीन मुली सापडल्या. यामध्ये एक मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट फोन आणि वॉटस्अपच्या माध्यमातून चालवले जात होते. आधी मुलींचे फोटो वॉटस्अपद्वारे ग्राहकांना पाठवले जात असत. त्यानंतर त्यांचे दर ठरवले जात होते. विशेष म्हणजे ज्या मुलीचे वय कमी, तिला जास्त पैसे ग्राहकांकडून मिळत असल्याचंही पोलिस तपासात उघड झाले आहे. एक तासासाठी 5 ते 10 हजार रुपये ग्राहकांकडून वसूल केले जात असत. तसेच 20 ते 30 वर्षांतील मुलींसाठी 3 ते 5 हजार दर ठरवले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अटक केलेल्या तीन मुलींपैकीच एकीच्या फ्लॅटमध्ये हा सगळा धंदा सुरू होता. या फ्लॅटची मालकीण या सगळ्या रॅकेटमधील मास्टर माईंड असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. यातली दुसरी महिला ही ग्राहक शोधायचं काम करत असे. विशेष म्हणजे या तिघींनी तीन वॉटस्अप ग्रुप तयार केले होते. या वॉटस्अप ग्रुपद्वारे त्या हे रॅकेट चालवत असत.

Loading Comments