ट्रॉम्बेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली


SHARE

ट्रॉम्बे - शनिवारी मध्यरात्री फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टनंतर ट्रॉम्बे परिसरात झालेल्या वादात 15 पोलीस जखमी झाले. तर, 20 नागरिक देखील जखमी झाले होते. ज्या तरुणाने फेसबुकवर ही पोस्ट टाकली. त्याच्यासह पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 31 जणांना पोलीसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याची ही घटना मोठी असल्याने याची दखल घेत गृह विभागाने बुधवारी अचानक ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोनूर यांची सोशल ब्रांचला तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी सध्या गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या