मुंबई विमानतळावर आता 36 कोटींचे कोकेन जप्त


मुंबई विमानतळावर आता 36 कोटींचे कोकेन जप्त
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शुक्रवारी 21 कोटींचे कोकेन पकडले गेल्यानंतर शनिवारी 36 कोटी रूपयांचे कोकेन पकडले गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने फ्रेडी एन्ड्रेस ट्रुइलो रेण्टेरिया (33) नावाच्या कोलंबियन नागरिकाला अटक केली आहे. 6 किलोंचे कोकेन लॅपटॉप बॅगेत पांढऱ्या फोमच्या 12 पाकिटात लपवण्यात आले होते. ही पाकिटे बॅकेमध्ये वेगवेगळे स्तर बनवून त्यात लपवण्यात आली होती.

हेही वाचा - 

मुंबई विमानतळावर 21 कोटींचे कोकेन जप्त

कोकेनची तस्करी करणारा 'गुडन्यूज' गजाआड

शनिवारी एक परदेशी तरुण मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला मिळाताच त्यांनी सापळा लावला आणि संशयावरून एडिस अबाडावरून आलेल्या फ्रेडी एन्ड्रेस ट्रुइलो रेण्टेरियाची झडती घेतली असता, त्याच्याकडे कोकेनचे घबाड सापडले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा