मुंबई विमानतळावर 21 कोटींचे कोकेन जप्त

 Mumbai Airport
मुंबई विमानतळावर 21 कोटींचे कोकेन जप्त
Mumbai Airport  -  

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी चालते. पण आता अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण देखील विमानतळावर वाढत चालल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावरून शुक्रवारी 21 कोटी रुपयांचेे कोकेन पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विमानतळावरुन तब्बल सव्वा तीन किलो कोकेनसह एका महिलेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शुक्रवारी अटक केली आहे. मेलगर डे क्लाउडिया (38)असे या महिलेचे नाव आहे. ही महिला बोलिव्हियाची नागरिक आहे.


हेही वाचा - 

मुंबई विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त!

महिलेच्या पार्श्वभागात सापडली आठ सोन्याची बिस्किटे


मेलगर डे ही महिला मुंबईला येणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. त्यावरून त्यांनी विमानतळावर सापळा रचला आणि मेलगर डेला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलिसांची नजर चुकवण्यासाठी कोकेन अतिशय पद्धतशीरपणे ट्रॉली बॅगेच्या आतील बाजूला लपवण्यात आले होते.


हेही वाचा - 

मुंबई विमानतळावर 18 कोटींचं कोकेन जप्त

ड्रग्ज तस्करीसाठी सेलिब्रेटींंच्या नावाचा वापर


गेल्या काही काळापासून विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून, हे तस्कर तस्करीसाठी महिलांचा अधिक वापर करत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. गेल्या महिन्यात एका महिलेकडून एनसीबीने 17 किलोंचे कोकेन जप्त केले होते. तर त्याआधी देखील एका महिलेकडून तब्बल पाच किलोंचे अंमली पदार्थ एनसीबीने जप्त केले होते.

Loading Comments