मुंबई एअरपोर्टवरून 62 लाखांचं पांढरं सोनं जप्त


मुंबई एअरपोर्टवरून 62 लाखांचं पांढरं सोनं जप्त
SHARES

मुंबई - मुंबई विमानतळावर तब्बल 1 किलो पांढरं सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास 30 लाख रुपये एवढी आहे. कस्टम विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी कस्टम विभागाने नईम बानू नावाच्या महिलेला अटक केली आहे.

दुबईहून आलेल्या नईमवर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिच्या सामानाच्या तपासणीत हे पांढरं सोनं जप्त करण्यात आलं. सोन्याच्या पट्ट्या या सामानाच्या लोखंडी हँडलमध्ये लपवण्यात आल्या होत्या.

दुसऱ्या एका कारवाईत कस्टम विभागाने दुबईहून येणाऱ्याला थाईल माजिद नावाच्या प्रवाशाला सव्वा किलो सोन्यासह अटक केली आहे. 1 किलो 235 ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत जवळपास 32 लाख एवढी आहे. सव्वा किलो वजनाची सोन्याची ही रिंग वॅक्युम क्लिनरच्या ट्यूबमध्ये अतिशय सफाईने लपवण्यात आली होती. या प्रकरणी थाईल माजिदने गुन्ह्याची कबुली दिली असून हे सोनं मोहम्मद अली नावाच्या व्यक्तीचं असल्याचं त्याने कस्टम विभागाला सांगितलं आहे. 15,000 रुपयांच्या मोबदल्यात त्याने हे सोनं भारतात आणल्याचं देखील त्याने चौकशीत सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा