किडनीसाठी होतेय मानवी तस्करी

ह्युमन ट्रॅफिकिंग अर्थात मानवी तस्करीला आजमितीस कोणताही देश पूर्णपणे थांबवू शकलेला नाही. मानवी तस्करीला बळी पडणाऱ्यांमध्ये स्त्री-पुरुष दोन्ही आहेत. मात्र, त्यातही स्त्रिया व बालिकांचं प्रमाण व त्यांच्यावरील अत्याचारांचं प्रमाण भयावह आहे.

किडनीसाठी होतेय मानवी तस्करी
SHARES

कोणीही व्यक्ती दुसऱ्या जिवंत व्यक्तीला विकत कसं घेऊ शकते? या प्रश्नानं आश्चर्य वाटलं असेल, तर जगातील मानवी तस्करीची माहिती जरूर घ्यावी. जगातील बहुतांश पीडित स्त्रियांच्या दु:खाला कारणीभूत ठरणारी मानवी तस्करी हा आजच्या काळातला सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग अर्थात मानवी तस्करीला आजमितीस कोणताही देश पूर्णपणे थांबवू शकलेला नाही. मानवी तस्करीला बळी पडणाऱ्यांमध्ये स्त्री-पुरुष दोन्ही आहेत. मात्र, त्यातही स्त्रिया व बालिकांचं प्रमाण व त्यांच्यावरील अत्याचारांचं प्रमाण भयावह आहे. जागतिक मानवी तस्करीची २०१८ मधील आकडेवारीनुसार भारतातून ८० लाख व्यक्तींची वेश्या व्यवसाय, मजूरी, अवयव तस्करी, इच्छेविरोधात लग्न आदी विविध कारणांसाठी तस्करी होते. जागतिक स्तरावर हाच आकडा ४ कोटी ३ लाखांवर गेला आहे.

मानवी अवयवांच्या तस्करीचा छुपा कारोबार देशभरात पसरला आहे.  त्यात किडनी तस्करीचं प्रमाण फार मोठं आहेहा गैरप्रकार किडनी देणाराकिडनी घेणाराडॉक्टरकिडनी प्रत्यार्पण समन्वयकदलाल आदींच्या संमतीने घडत असतो. त्यामुळे हे प्रकार खूप कमी बाहेर पडतातइतिहास पाहिल्यास पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाल्यानंतर अंतर्गत व्यक्तींनीच हे प्रकार उघडकीस आणले आहेत. पण जाणकारांच्या मतेपूर्वी परदेशी नागरीकांसाठी होणारी ही तस्करी आता देशातील धनाढ्यांसाठी केली जात आहेआर्थिक असमानता व वाढती लोकसंख्या त्याचं मुख्य कारण आहेत्या अनुषंगाने या काळाबाजारावर टाकलेला एक दृष्टीक्षेप...


किडनी रॅकेट्सचा इतिहास

एकेकाळी मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली व हैद्राबाद सारख्या महानगरांमध्ये चालणारा हा काळा बाजार काळानुसार बदलून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. १९८० मध्ये महानगरांतील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जायचं. त्यात महिलांचाही समावेश असायचा. कर्ज, घरची हलाखीची परिस्थिती अशा कारणांमुळे मोठ्या प्रमाणात किडनी विकल्या जायच्या. त्या काळात भारतातच या शस्त्रक्रिया केल्या जायच्या. जगभरात भारतात सर्वात स्वस्तात किडनी मिळून जायची. अगदी १०-२० हजार रुपयांमध्येही १९८०-९० मध्ये किडनी उपलब्ध व्हायची. पण १९९४ मध्ये मानवी अवयव कायदा अस्तित्त्वात आल्यामुळे परिस्थिती पालटली. हा सगळा गैरप्रकार कायद्याच्या कक्षेत आला. त्यानंतर मानवी अवयवांची खरेदी - विक्री खुलेआम करणं कठीण होऊन बसलं. भारतीय किडनींसाठी परदेशी मागणी आटली.


प्रत्यार्पण भारताऐवजी परदेशात

पण बदलल्या जीवनशैलीमुळे भारतातच किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामुळे अशा धनाढ्य रुग्णांसाठी किडनीची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. देशात वाढत्या जागृतीमुळे किडनी प्रत्यार्पण भारताऐवजी परदेशात होऊ लागले. इजिप्त, श्रीलंका यासारख्या देशांमधील रुग्णालयांमध्ये खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने किडनीचे बेकायदेशीररित्या प्रत्यार्पण केले जाऊ लागले. किडनी विक्री देशात कठीण झाल्यामुळे किडनीच्या खरेदी-विक्रीच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.


इजिप्तश्रीलंकेत विक्री

पवई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवलेल्या किडनी विक्री प्रकरणात किडनी विक्रेत्यासाठी २१ लाखांची रक्कम मोजली होती. त्यातील आठ लाख रुपये अटक आरोपी निलेश कांबळेकडे सापडले होते. याशिवाय ४.७५ लाखांची रुग्णालयाची फी भरण्यात आली होती. पण प्रत्यक्षातील हा व्यवहार यापेक्षा मोठा असल्याचा संशय आहे. २०१७ मध्ये सहार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवलेल्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणात जम्मू काश्मीर, केरळातील गरीब किडनी विक्रेत्यांना हेरून त्यांना इजिप्त, श्रीलंकेत पाठवून त्यांच्या किडन्या काढण्यात आल्या. त्यासाठी त्यांना ५ लाख रुपये देण्यात आले. त्यांना परदेशात पाठवणाऱ्या दलालाला यासाठी ४० हजार रुपये मिळायचे. मुख्य आरोपीचे कमिशन लाखो रुपये असल्याचं बोललं जातं.


भारत मोठं मार्केट

पवईतील किडनी रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर किडनी देणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली असता तो मध्यप्रदेशचा असल्याचं पुढं आलं. पुढील चौकशीत तो ज्या गावात वास्तव्यास होता त्या गावातील घरटी एका व्यक्तीने गरीबीमुळे पैशांसाठी किडनी विकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. लंडन, अमेरीका, रशिया व आखाती देशांतील उच्चभ्रू रुग्णांसाठी भारत हे किडनी खरेदी करण्याचं मोठं मार्केट मानलं जातं. 


महिलांची तस्करी 

बहरीन येथे भारतातून महिलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश करत तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून त्यांनी आतापर्यंत ६०० हून अधिक जणींना परदेशात वेश्या व्यवसायात ढकलल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी टिंकू राज याच्या घरात परदेशात पाठवण्यात येणाऱ्या ६० महिलांचे पासपोर्ट आढळून आल्याने त्यांना जाण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं.


महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर 

भारतातून २०१८ मध्ये सर्वाधिक १९ हजार २२३ महिला आणि मुलांची तस्करी करण्यात आली आहे. महिला तस्करीत महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातील बहुतांशी मुली या पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, मणीपूर येथील आहेत. महिलांबरोबरच लहान मुलं आणि तरुणांना कामाचं आमीष दाखवून परदेशात नेलं जातं. तेथे त्यांना सक्तमजुरी करण्यास लावलं जातं.  गल्फ आणि दक्षिण आशियात असे ६ लाखा पिडित आढळून आले होते.  



हेही वाचा -

लोखंडी राॅड कारवर पडला, फॅशन डिझाईनर महिला थोडक्यात बचावली

पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा, पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा