लोखंडी राॅड कारवर पडला, फॅशन डिझाईनर महिला थोडक्यात बचावली

रिंकूची गाडी ही जोगेश्वरी उड्डाणपूलावर आली असताना. अचानक तिच्या गाडीवर उभा लोखंडी राँड काचेतून घुसला. ८ ते १० फूट लांबीचा हा राँड १६ एम एमचा आहे. या दुर्घटनेवेळी पिडीत रिंकू जैन ही चालकाच्या शेजारीच पुढच्या सीटवर बसली होती.

लोखंडी राॅड कारवर पडला,  फॅशन डिझाईनर महिला थोडक्यात बचावली
SHARES

मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून कारवर राॅड पडल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गाडीतील महिला थोडक्यात बचावली. या घटनेचा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अगदी काही इंचावर हा राॅड पडल्याने महिला  बचावली असून या घटनेचा फोटो  अंगावर काटा आणणारा आहे.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो राॅड कारवरून हटवला.


चालकाने गाडी सावरली

मुंबईत मंगळवारी पावसाचा जोर वाढला असताना गोरेगाव परिसरात राहणाऱ्या रिंकू जैन हिने मुंबईला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली होती. रिंकू ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. रिंकूची गाडी जोगेश्वरी उड्डाणपूलाखाली आली असताना अचानक  गाडीवर उभा लोखंडी राॅड काचेतून घुसला. ८ ते १० फूट लांबीचा हा राॅड १६ एमएमचा आहे.  रिंकू जैन ही चालकाच्या शेजारीच पुढच्या सीटवर बसली होती. या दुर्घटनेनंतर चालकाचेही गाडीवरील नियंत्रण सुटले होते. मात्र वेळीच त्याने गाडी सावरली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, तो राॅड गाडीच्या काचेतून काढला. हा राॅड कसा पडला आणि कुणाच्या बांधकाम साईटचा आहे. याचा पोलिस शोध घेत आहे.हेही वाचा -

पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा, पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

CCDचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नदीत सापडला मृतदेह
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा