पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा, पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

२०१० मध्ये आयानवर मारामारी आणि अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मात्र अपहरण गुन्ह्यात त्याचे नाव कमी केले गेले. तर मारामारीच्या गुन्ह्यात आयानचा सहभाग नसल्यामुळे पोलिसांनी त्याचे नाव कमी करून बी समरी फाईल केली होती.

पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा, पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
SHARES

मुंबईच्या भांडूप पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी २ पोलिस उपनिरीक्षक, २ पोलिस हवालदार, यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन कोकरे आणि पंकज शेवाळे तर हेड कॉन्स्टेबल घोसाळकर, कॉन्स्टेबल गायकवाड आणि जुमले अशी या पोलिसांची नावे आहेत. आयान खान या सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस २३ जुलै रोजी चक्क पोलिस ठाण्यात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी केक कापताना व्हिडिओही काढण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. याची दखल घेत वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. गंभीर गुन्ह्यांची नोंद 

२०१० मध्ये आयानवर मारामारी आणि अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मात्र अपहरण गुन्ह्यात त्याचे नाव कमी केले गेले. तर मारामारीच्या गुन्ह्यात आयानचा सहभाग नसल्यामुळे पोलिसांनी त्याचे नाव कमी करून बी समरी फाईल केली होती. पोलिसांनी आरोपीचा पोलिस ठाण्यात वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत चारही पोलिस दोषी आढळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सिंह यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.हेही वाचा -

CCDचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नदीत सापडला मृतदेह

विनयभंग प्रकरणी रिक्षा चालकाला अटक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा