भांडणात मध्यस्थी केल्याने शेजाऱ्याचं घर पेटवलं

नशेच्या आहारी गेलेला अशोक सर्व पैसे दारूतच उडवायचा. यावरून पत्नीसोबत त्याचे वारंवार खटके उडायचे. २६ एप्रिलला रात्री दारूच्या नशेत अशोक घरी आला. यावेळी त्याने पत्नीसोबत भांडण सुरु केले. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली.

भांडणात मध्यस्थी केल्याने शेजाऱ्याचं घर पेटवलं
SHARES

 पत्नीसोबत झालेल्या वादात शेजाऱ्याने मध्यस्थी केल्याने राग अनावर झालेल्या नवऱ्याने शेजाऱ्याच्या घराला आग लावली. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात ही घटना घडली. स्थानिकांनी तात्काळ आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी अशोक शर्मा याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.


पत्नीला बेदम मारहाण 

घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील कामगारनगर चाळीत अशोक शर्मा पत्नी आणि मुलासोबत राहतो.  अशोक एका खासगी ठिकाणी काम करायचा. नशेच्या आहारी गेलेला अशोक सर्व पैसे दारूतच उडवायचा. यावरून पत्नीसोबत त्याचे वारंवार खटके उडायचे. २६ एप्रिलला रात्री दारूच्या नशेत अशोक घरी आला. यावेळी त्याने पत्नीसोबत भांडण सुरु केले. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर घरातील सर्व सामान तो घराबाहेर फेकत होता. हा सर्व प्रकार पाहून घाबरलेला त्याचा लहान मुलगा शेजारी राहणाऱ्या राजगोपाल नाडर यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेला.


पेट्रोल ओतून घर पेटवलं

नाडर यांनी तातडीने शर्माच्या घराजवळ धाव घेतली. त्यावेळी शर्मा त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. नाडर यांनी त्याला रोखत समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्माने त्याच्यावरही आवाज चढवला. नाडरच्या मदतीला इतर शेजारी एकवटल्याने शर्मा अजून संतापला. त्यावेळी घरातून काढता पाय घेत शर्माने नाडरला बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर काही तासांनीच शर्मा पेट्रोल घेऊन आला. त्याने नाडर यांच्या घराच्याबाहेर आणि आजूबाजूला पेट्रोल ओतत घर पेेेेटवून तेथून पळ काढला.  


सीसीटिव्हीत उघडकीस

शेजारील एक महिला घराबाहेर आली त्यावेळी तिने नाडर यांच्या घराबाहेर आग लागल्याचे पाहून आरडाओरडा केला. तसंच बाहेर भरलेेेेल्या पिंपातील पाणी ओतून तिने आग विझवण्यास सुरू केली. त्यानंतर चाळीतील सर्वच नागरिक आग विझवण्यासाठी पुढे सरसावले. या आगीत नाडर यांच्या घराचा दरवाजा जळाला. मात्र ही आग लागली कशी लागली हे पाहण्यासाठी नाडर यांनी घराबाहेर लावलेले सीसीटिव्ही तपासले असता शर्माने ही आग लावली असल्याचं दिसत होतं.  या घटनेनंतर  नाडर यांनी पंतनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ४३६,५०६,५०४,५११ भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून शर्माला पोलिसांनी अटक केली आहे.  



हेही वाचा -

भाजप नगरसेवकाचा मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

वरळीमध्ये तरुणीकडे पाहून पुन्हा विकृतांचे अश्लील चाळे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा