लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीची हत्या

Gorai
लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीची हत्या
लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीची हत्या
See all
मुंबई  -  

गोराईत गेल्या महिन्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा तिढा सोडवण्यात एमएचबी पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्या करून या नववधुचा मृतदेह गोराईतील झुडपात टाकणाऱ्या तिच्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आसिक सिद्दीकी (25) असे आरोपीचे नाव असून सब्रीन सिद्दीकी (22) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

6 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे सब्रीन आणि आसिफ सिद्दीकी यांचे लग्न झाल्यावर दोघेही मुंबईच्या दिशेने निघाले. 8 एप्रिलला मुंबईला पोहचल्यावर पहिल्याच रात्री आसिफने गळा आवळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह गोराई येथील झुडपात फेकून दिला. सब्रीन आणि आसिफ यांचे मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध असले, तरी तरी आसिफला सब्रीनसोबत लग्न करायचे नव्हते. तरीही केवळ घरच्यांच्या दबावाखाली त्याने तिच्यासोबत लग्न केले. परंतु मुंबईतील घरी आल्यावर आसिफने आपल्या मनातला सगळा राग लग्नाच्या पहिल्या रात्री काढत सब्रीनची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह गोराईच्या झुडपात फेकून दिला.

एमएचबी पोलिसांना 10 एप्रिलला सब्रीनचा मृतदेह सापडला. त्यानंतर अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. पण सब्रीन मूळची मुंबईची नसल्याने तिच्या नातेवाईकांचा पत्ता लागत नव्हता. सुदैवाने तिचे दोन्ही भाऊ मुंबईला कामाला असल्याने त्यांनी लग्नानंतर काही दिवस उलटून गेल्यावर आसिफकडे आपल्या बहिणीची चौकशी केली. तेव्हा आसिफने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यातच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर सब्रीना सारख्या दिसणाऱ्या अज्ञात मृत महिलेचा फोटो आला. तिच्या भावांनी एमएचबी पोलीस ठाण्यात चौकशी केल्यावर अखेर या महिलेची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांच्या टीम तात्काळ उत्तर प्रदेशसाठी रवाना झाल्या आणि आसिफला ताब्यात घेतले.

आम्ही विवाहितेच्या हत्येप्रकरणी आसिफ सिद्दीकीला अटक केली असून त्याला मुंबईला आणण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ 11 चे पोलीस उप आयुक्त विक्रम देशमाने यांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.