'ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी'

 Pali Hill
'ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी'

मुंबई - कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप रियाज भाटी यांनी फेटाळून लावलाय. भाजप, दाऊद आणि एकूणच या वादाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्टीकरण रियाज भाटी यांनी दिलंय. "दाऊदचा माणूस असतो, तर संरक्षण कसं मिळालं असतं," असा प्रतिसवालच भाटी यांनी केलाय.

"माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्यानं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार," असं भाटी यांनी स्पष्ट केलंय. "माझ्याकडे दोन पासपोर्ट असल्याचा आरोप चुकीचा आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये अडकलो असतो तर इतक्या लवकर सुटलो असतो का," असं विचारत गँगस्टरशी संबंध असणारा मुंबईत कसा राहू शकेल, असा प्रश्नही त्यांनी केलाय.

"भाजपशी माझा काहीही संबंध नाही, त्याचप्रमाणे कोणताही वादही नाही. मी एमसीएच्या मार्केटिंग कमिटीचा अध्यक्ष आहे. त्यामुळेच आशिष शेलारांशी संबंध येतो. त्याचप्रमाणे शरद पवारांशीही भेट होते," असंही भाटी यांनी स्पष्ट केलंय.

Loading Comments