New year राज्यात अवैध दारूविक्रीवर प्रकरणी वर्षभरात २१,८२९ जणांना अटक

२०१९ एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान राज्यभरात केलेल्या कारवाईत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर ३०,५७८ गुन्हे नोंद करण्यात आले.

SHARE

मुंबईसह देशभरात सध्या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्ट्यांना मद्यपींसाठी लागणाऱ्या दारूची अवैधरित्या आयात केली जात आहे. नुकतीच राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाच्या कारवाईतून ही बाब पुढे आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाक्यावर मोठीकारवाई होती. उत्पादन शुल्क विभागाने उगारलेल्या कारवाईच्या बडग्यात पहिल्या आठ महिन्यांतच ७२ कोटी ७० लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नववर्ष स्वागतानिमित्त होणारे ‘सेलिब्रेशन’ दरम्यान हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा ः- New Year: ३१ डिसेंबर निमित्ताने वाहतूक मार्गात बदल

मुंबई शहर आणि उपनगरातही पहिल्या आठ महिन्यांतच दोन कोटी ८३ लाख रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. तर मागील वर्षांत दोन कोटी पाच लाख रुपयांचे मद्य जप्त केले होते. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने उपनगर विभागात प्रशासनाने कारवाईसाठी १४ पथके नेमली आहेत. मुंबईत मागील वर्षी मद्याच्या अवैध निर्मिती, विक्री आणि वाहतूकीसंदर्भात एक हजार ६७८ गुन्हे नोंद केले होते. २०१९ डिसेंबरपर्यंत १,२१२ गुन्हे नोंद झाले असून १,०९५ जणांनाअटक केली आहे.  २०१८ च्या तुलनेत  २०१९ मधील शेवटच्या आठ महिन्यातच त्यात दुपटीहून अधिकची वाढ नोंदवली गेली आहे.  २०१९ एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान राज्यभरात केलेल्या कारवाईत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर ३०,५७८ गुन्हे नोंद करण्यात आले. तर एकुण एक कोटी दोन लाख लीटर विविध प्रकारचे देशी-विदेशी मद्य आणि मद्यार्क जप्त केले. उत्पादन शुल्क विभागाने राज्यभरात अवैध आणि बनावट मद्य निर्मिते, विक्रेते आणि वाहतुकदार यांच्याविरुद्ध चालविलेल्या अभियानातून हे मद्य जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचाः- New Year मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू, राज्य सरकारची परवानगी

राज्यभरात आतापर्यंत केलेल्या कारवाईतून २१,८२९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच बेकायदा मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली २,३२३ वाहनेही विभागाने जप्त केली आहेत. मागील वर्षी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ९४ कोटी चार लाख रुपयांचा माल जप्त केला होता. त्यामध्ये एक कोटी ५१ लाख लीटर बनावट आणि अवैध मद्य होते. राज्यभरात ४४ हजारांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये ३०,९६० जणांना अटक व २६५१ वाहने जप्त केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या